Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar Criticized CID: ४ महिन्यांनंतरही ठोस माहिती नाही; रोहित पवारांची ‘CIDच्या संथ कारभारावर जोरदार टीका

Rohit Pawar Criticized CID: : पूर्वी सीआयडीकडून केल्या जणाऱ्या तपासाबद्दल शंका उपस्थित केली जात नव्हती. आता परिस्थिती बदलली आहे. सीआयडीकडून जबाबदारीने काम केले जात नाही. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात तपास काय झाला? याची माहिती घेण्यासाठी गेले चार महिने प्रयत्न केले जात आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 30, 2026 | 12:10 PM
प्रकृती अस्वस्थ्यामुळे रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

प्रकृती अस्वस्थ्यामुळे रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Follow Us
Follow Us:
  • अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाला चार महिने उलटून गेले- रोहित पवार
  • चार महिन्यानंतरही ठोस माहिती, तसेच तपासातील प्रगती अहवाल सादर करण्यात आला नाही- रोहित पवार
  • सीआयडीकडून तपास संथगतीने होत आहे- रोहित पवार
Rohit Pawar on Ajit Pawar Accident Investigation: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाला चार महिने उलटून गेले असून, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) चार महिन्यानंतरही ठोस माहिती, तसेच तपासातील प्रगती अहवाल सादर करण्यात आला नाही. तपास होणार नसेल तर ‘सीआयडी’ कार्यालयाला टाळे लावा, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी केली.

दिवंगत मुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत विमान अपघात झाला. अपघात प्रकरणाचा सखोल तपास करुन दोषींवर कठोर कारवाईची मागणी रोहित पवार हे सातत्याने करत आहेत. विमान अपघात प्रकरणाचा तपास ‘सीआयडी’कडून सुरू आहे. सीआयडीकडून तपास संथगतीने होत आहे. अद्याप ठोस कारवाई तसेच तपासातील प्रगती अहवाल सादर करण्यात आला नाही, अशी टीका रोहित पवार यांनी शुक्रवारी (२९ मे) केली. ‘सीआयडी’ कार्यालयाला पवार यांनी भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. पवार हे कुलूप घेऊन ‘सीआयडी’ कार्यालयात आले होते.

Manoj Jarange Hunger Strike: “तळपत्या उन्हात तडफडून मरू दिलं तरी चालेल…”; उपोषण सुरू करताना जरांगे पाटील आक्रमक

तपास योग्य दिशेने सुरू

विमान अपघात प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. सीआयडीकडून विविध विभाग, तसेच संस्थाशी संपर्क साधण्यात आला आहे. विविध यंत्रणाकडून तपासाच्या अनुषंगाने लागणारी माहिती, तसेच अहवाल मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे’, अशी माहिती सीआयडीतील अधिका-यांनी दिली.

पण अजित पवार यांच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणाच्या तपासात चार महिने उलटूनही कोणतीही ठोस प्रगती झालेली दिसत नाही. तपासातील या विलंबामुळे प्रकरणातील संभाव्य कट किंवा गैरप्रकार दडपले जात आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, सीआयडी कार्यालयाला भेट दिल्यानंतर वरिष्ठ अधिकारी भेटले नाहीत आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत, अशी तक्रार त्यांनी केली.

Pune Crime: पुण्यात विषारी दारूचं थैमान! 15 जणांचा मृत्यू, पोलिस आयुक्तांचा दणका; अनेक अधिकारी निलंबित

सीआयडीवरील टीका

रोहित पवार म्हणाले की, पूर्वी काही गाजलेल्या प्रकरणांमध्ये सीआयडीने तुलनेने जलद गतीने आरोपपत्र दाखल केले होते, मात्र या प्रकरणात तपास संथ असल्याचे दिसत आहे.  पण  एएआयबी (Aircraft Accident Investigation Bureau) अहवालाची वाट पाहणे हा केवळ बहाणा असल्याचाही आरोप केला.

‘सीबीआय’कडे तपास सोपविण्याची केली मागणी

“पूर्वी सीआयडीकडून केल्या जणाऱ्या तपासाबद्दल शंका उपस्थित केली जात नव्हती. आता परिस्थिती बदलली आहे. सीआयडीकडून जबाबदारीने काम केले जात नाही. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात तपास काय झाला? याची माहिती घेण्यासाठी गेले चार महिने प्रयत्न केले जात आहे. अजित पवार विमान अपघात प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

 

 

 

Web Title: Rohit pawar cid office protest pune 2026 ajit pawar plane accident investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • baramati news
  • Maharashtra Politics
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Satara Politics: ‘पालिका प्रशासनावर बोलल्यावर सत्ताधाऱ्यांना मिरच्या का झोंबतात?’ किशोर सोनवणेंचा सवाल
1

Satara Politics: ‘पालिका प्रशासनावर बोलल्यावर सत्ताधाऱ्यांना मिरच्या का झोंबतात?’ किशोर सोनवणेंचा सवाल

Mira Bhayandar Politics: ‘दहा कोटींच्या उत्पन्नाचा पुरावा द्या, नाहीतर राजीनामा द्या!’ नरेंद्र मेहतांचे प्रताप सरनाईकांना आव्हान
2

Mira Bhayandar Politics: ‘दहा कोटींच्या उत्पन्नाचा पुरावा द्या, नाहीतर राजीनामा द्या!’ नरेंद्र मेहतांचे प्रताप सरनाईकांना आव्हान

Maharashtra Breaking News Today 2026:  दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोर्चावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार!
3

Maharashtra Breaking News Today 2026: दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोर्चावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार!

‘जात पडताळणी समिती रद्द केली तर…’; छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध
4

‘जात पडताळणी समिती रद्द केली तर…’; छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.