मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या भेटी (Meeting) घेत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू तथा कर्जत-जामखेडचे (Karjat- Jamkhed) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. रोहित पवार यांनीच या भेटीचे दोन फोटो ट्विटरवरुन पोस्ट केले आहेत.
मतदारसंघासह विविध विषयांवर मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची आज मुंबईत भेट घेऊन चर्चा केली.@mieknathshinde pic.twitter.com/5hdq81L4hx
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 27, 2022
रोहित पवार यांनी बुधवारी रात्री साडेनऊ वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती ट्विटमधून दिली आहे. रोहित पवार यांनी, मतदारसंघासह विविध विषयांवर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची आज मुंबईत भेट घेऊन चर्चा केली, असे त्यात म्हटले आहे.