उस्मानाबाद : तुळजापूर (Tuljapur) तालुक्यातील सिंदफळ येथील पीडित सहा वर्षीय बालिकेची (Tuljapur Rape Case) राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी भेट घेतली. पीडितेच्या भेटीनंतर समाजात महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी समाजात जनजागृती होणे गरजेचे असल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
[read_also content=”कौन बनेगा करोडपतीच्या नावाने ३० लाखांची फसवणूक https://www.navarashtra.com/maharashtra/30-lakh-fraud-by-using-kaun-banega-crorepati-name-nrsr-321800.html”]
आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी शिफारस महिला आयोग करणार आहे, असे रूपाली चाकणकर म्हणाल्या. पीडितेच्या नातेवाईकांना मनोधैर्य योजने अंतर्गत ३ लाख रुपये मदत करण्यात आली आहे. पोलीस योग्य तपास करत असून १४ दिवसात चार्जशीट दाखल होईल. तसेच खटला फास्टट्रक कोर्टात चालेल असे चाकणकर यांनी सांगितले.
बलात्काराची घटना घडताना प्रत्यक्ष काही कामगार महिलांनी आरोपीस रंगेहाथ पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले. आरोपी पुर्वी महिला अत्याचार व बलात्कार प्रकरणातील सराईत शिक्षा भोगलेला गुन्हेगार असताना पोलीस प्रशासनाने त्यावर नजर ठेवली नाही. कायद्याची कडक अंमलबजावणी होणं फार गरजेच आहे, असंही त्यांनी सांगितलं.
६ वर्षांच्या मुलीवर अत्याचार
तुळजापूर तालुक्यातील एका गावात ६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार करण्यात आला. पीडित मुलीवर तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर आहे. गावकऱ्यांनी एका आरोपीला अटक करुन पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. तुळजापूर पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.