फोटो सौजन्य - Social Media
२७ ऑक्टोबर २०२५ रोजी, जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२५ आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश युवकांचा सर्वांगीण विकास आहे. तसेच भारतीय संस्कृतीचे जतन या माध्यमातून करण्यात येणार आहे. तसेच हा कार्यक्रम सुप्त कलागुणांना प्रोत्सहन देण्यासाठी दरवर्षी जिल्हास्तरावर आयोजित केला जातो. जर तुम्ही या कार्यक्रमात अर्ज करण्यास इच्छुक आहेत तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. मुळात, फक्त ४ नोव्हेंबरपर्यंत त्या कार्यक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी युवकांना https://forms.gle/Kmof5ut
KSuEqL3P69 हा गुगल फॉर्म भरावा लागणार आहे. इच्छुक युवकांनी दिलेल्या मुदतीत आणि फॉर्मद्वारे लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रा. मार्क धरमाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
हा महोत्सव राष्ट्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या “Viksit Bharat Challenge Track” या उपक्रमांतर्गत आयोजित केला जात आहे. मुळात, जिल्हास्तरीय युवा महोत्सव हा केवळ एक प्राथमिक टप्पा आहे. यानंतर राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल. राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५-२६ चे राष्ट्रीय आयोजन १० ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान होणार आहे, याची नोंद घेण्यात यावी.
‘या’ वयोगटातील युवकांना घेता येईल सहभाग
महोत्सवात युवकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वक्तृत्व, कथा लेखन, कविता लेखन, चित्रकला, लोकनृत्य, लोकगीत आणि नवोपक्रम (विज्ञान प्रदर्शन) या स्पर्धांचा समावेश आहे. तुम्हाला आवडेल त्या स्पर्धेमध्ये तुमच्या इच्छेनुसार तुम्ही सहभाग नोंदवू शकता. एकंदरीत, किमान वय १५ वर्षे निश्चित करण्यात आले आहे तर जास्तीत जास्त २९ वर्षे आयु असणारे उमेदवार या कार्यक्रमात नोंदणी करू शकतात.
स्पर्धांबाबतची सविस्तर माहिती आणि नियमावली www.dsomumbaicity.blogspot.com या ब्लॉगवर उपलब्ध आहे. तसेच अधिक माहितीसाठी अनिल घुगे (स्पर्धा प्रमुख), जिल्हा युवा महोत्सव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






