संभाजी भिडे यांचे 6 जून शिवराज्याभिषेक दिनाबाबत वादग्रस्त विधान चर्चेत आला आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे हे नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केल्यामुळे राजकारण तापले आहे. आता पुन्हा एकदा संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होँण्याची शक्यता आहे. त्यांनी आज (दि.23) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याबाबत वक्तव्य केले आहे. यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे. नुकतीच संभाजी भिडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीबाबत त्यांनी कारण सांगितले आहे. संभाजी भिडे म्हणाले की, आमच्या भेटीमध्ये देव, देश आणि धर्म या विषयांवर चर्चा झाली. आमची व्यक्तिगत किंवा राजकीय चर्चा झालेली नाही, अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिका करा
याचबरोबर राज्यामध्ये लवकरच शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. राज्यामध्ये तिथीप्रमाणे आणि तारखेप्रमाणे असे दोन वेळा शिवराज्याभिषेक सोहळा केला जातो. 6 जून रोजी तारखेप्रमाणे हा सोहळा साजरा केला जातो. मोठ्या प्रमाणामध्ये तरुण यामध्ये सहभागी होत मोठ्या उत्साहाने शिवराज्यभिषेक केला जातो. मात्र या तारखेप्रमाणे होणाऱ्या राज्यभिषेक सोहळ्याला संभाजी भिडे यांनी विरोध केला आहे.
संभाजी भिडे शिवराज्याभिषेकाबाबत बोलताना माध्यमांसमोर म्हणाले की, 6 जूनचा राज्याभिषेक सोहळा नामशेष केला पाहिजे. 76 वर्षे झाली तरीही आपलं मानसिक अधिष्ठान ब्रिटिशांकडे स्वाधीन करुन ठेवलंय. महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या तिथीप्रमाणेच शिवराज्यभिषेक स्मरण दिन केला पाहिजे. 6 जूनचा बंदच केला पाहिजे, असे स्पष्ट मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केले आहे. मात्र यामुळे काही शिवभक्तांच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्यामध्ये सध्या वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येप्रकरणावरुन वातावरण तापले आहे. यामध्ये तिला कौटुंबिक छळ झाल्याने तिने आत्महत्या केली आहे. तिच्या सासऱ्याची राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण देखील लागले आहे. याच पार्श्वभूमीवर माध्यमांनी संभाजी भिडे यांना प्रश्न केले. याबाबत ते म्हणाले की, हुंडा पद्धत ही देशाला कलंक असलेली गोष्ट आहे. त्यामुळे हुंडा पद्धत नामशेष झाली पाहिजे, पण हे करताना राजकारण करता कामा नये, अशी भूमिका संभाजी भिडे यांनी घेतली आहे.
मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक केली आहे. सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली होती. गेल्या सात दिवसांपासून हे दोघेही फरार होते. अखेर आज पहाटे बावधान पोलिसांनी दोघांनाही अटक केली. दरम्यान घटनेनंतर पोलिसांनी वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना आधीच अटक केली होती. पण सात दिवसांपासून हे दोघे तळेगाव परिसरातच लपून बसले होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी शिताफीने दोघानांही ताब्यात घेतले. १७ मे रोजी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये काही मित्रांसोबत जेवत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये आढळून आले.अखेर पोलिसांनी आज पहाटे स्वारगेट परिसरातून वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक केली.