आणखी एका रेल्वेमार्गाची निर्मिती केली जाणार; संभाजीनगर-पुणे प्रवास आता साडेचार तासांत होणार (फोटो सौजन्य - pinterest)
छत्रपती संभाजीनगर : स्वस्त आणि आरामदायी प्रवास म्हणून रेल्वे प्रवासाकडे पाहिले जाते. त्यात विदर्भ, खानदेश आणि मराठवाडा या तीनही विभागांना औद्योगिकदृष्ट्या बळ देणारा एक महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याच्या उंबरठ्यावर आहे. छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर या नव्या रेल्वेमार्गासाठी तब्बल 2900 कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे. हा प्रकल्प केंद्र व राज्य शासनाच्या 50-50 टक्के सहभागातून उभारण्यात येणार आहे.
प्रकल्पात राज्य सरकारकडून जमीन अधिग्रहणाची जबाबदारी घेतली जाणार असून, केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष अधिग्रहणाला सुरुवात होणार आहे. या नव्या रेल्वेमार्गामुळे छत्रपती संभाजीनगर ते पुणे शहरातील अंतर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. विशेष म्हणजे, फास्ट शटल सेवेच्या माध्यमातून फक्त साडेचार तासांत उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि नोकरीच्या संधींसाठी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा मोठा वेळ आणि खर्च वाचणार आहे. नव्या रेल्वेमार्गामुळे छत्रपती संभाजीनगर ते पुणे शहरातील अंतर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
हेदेखील वाचा : Dadar Kabutar Khana News : दादरच्या कबुतरखाना परिसरात तणावपूर्ण वातावरण; जैन समाजाच्या आंदोलकांनी थेट काढली ताडपत्री
विशेष म्हणजे, फास्ट शटल सेवेच्या माध्यमातून फक्त साडेचार तासांत पुणे गाठणे शक्य होणार आहे. मराठवाड्यातील महत्त्वाचे शहर असलेले छत्रपती संभाजीनगर आणि आयटी हब म्हणून ओळखले जाणारे पुणे या महत्त्वाच्या दोन शहरांदरम्यान प्रवास करायचा असेल तर नऊ तास लागतात.
159 किमीचे अंतर कमी होणार
छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर या रेल्वे करताना १५९ किमीचा फेरा कमी होणार आहे. तर छत्रपती संभाजीनगर ते पुणे शहरातील अंतर २५० किमीपेक्षा कमी होणार आहे. हा डीपीआर केंद्राच्या कॅबिनेटसमोर सादर करण्यात आला आहे, अशी माहिती माजी केंद्रीयमंत्री आणि खासदार डॉ. भागवत कराड यांनी दिली.
421 किमीचे अंतर
या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवासांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु, छत्रपती संभाजीनगर येथून पुण्याला जायचे असेल तर मनमाड, कोपरगाव, बेलापूर आणि अहिल्यानगर मार्गे असे 421 किमीचे अंतर पार करावे लागते.






