धनंजय मुंडे यांच्यानंतर आता 'या' मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी राज्य सरकारवर वाढतोय दबाव (फोटो - सोशल मीडिया)
बीड : मागील दोन महिन्यांपासून बीडचे राजकारण तापले आहे. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या हत्येमुळे बीडमधील वातावरण तापले असून धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. वाल्मिक कराडचे नाव समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. महाविकास आघाडीसह महायुतीमधील नेते देखील त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. आता महायुतीमधील आणखी एका नेत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे संबंध समोर आल्यामुळे ही टीका वाढली आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी अनेक पुरावे सादर केले आहेत. याचबरोबर महायुतीमधील भाजप नेते व आमदार सुरेश धस यांनी देखील धनंजय मुंडेंवर आगपाखड केली आहे. यावर आता शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी बुलढाणामध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. संजय गायकवाड म्हणाले की, राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी असा वाद कुठेही नाही. मला तरी ओबीसी आणि मराठा हा वाद कुठेही दिसला नाही. महायुतीला विधानसभेत मोठ यश मिळालं आहे. त्यामुळे आम्हाला कुठेही जातीयवाद दिसून आला नाही. हा देश हिंदूंचा आहे ते जर जातीयवाद म्हणत आहे, ते त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीच लक्षण आहे, असे मत शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी बीडमधील धनंजय मुंडे यांच्यावरुन सुरु असलेल्या राजकीय वाद सुरु आहे. ते म्हणाले की, कोणत्याही घटना पूर्वीच्या आधारावर होत असतात, अजूनही कोणत्याही तपास यंत्रणेला पुरावा मिळाला नाही. धनंजय मुंडेंच्या विरोधात कुठलाही पुरावा मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट भूमिका घेत जोपर्यंत त्यांचा सहभाग दिसून येत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात कुठलीही कारवाई होणार नाही. अशी भूमिका संजय गायकवाड यांनी घेतली आहे.
संजय राऊत यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. यावर संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “शरद पवार हे देशातील खूप मोठं नेतृत्व आहे. शरद पवार यांचे मातोश्रीचे संबध सर्वांना माहित आहे. एखाद्या व्यतीच्या कामाचा सन्मान जर केला असेल तर तो त्यांचा स्वभाव आहे. संजय राऊतांना एकनाथ शिंदेंची कोणतीही चांगली गोष्ट सहन झाली नाही. ते सदैव आमचा तिरस्कार करतात. शेवटी राजन साळवी गेले, काल तीन खासदार आमच्या नेत्यांच्या पंगतिला गेलेत. आज त्यांचा पक्ष सांभाळता त्यांच्यात नाकात दम येणार आहे. किती लोक राहतील व टिकतील हे सांगू शकत नाही. त्यामुळे राऊतांचा जळफळाट हा कायमच राहणार आहे,” असे मत संजय गायकवाज यांनी व्यक्त केले आहे.