Photo Credir- Social Media (संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली)
मुंबई: “पापाचा घडा भरला अन् निवडणूक आयोगालाही लाज वाटल्याने फडणवीसांच्या ‘लाडक्या ताई’ला हटवण्यात आले,” अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. काँग्रेससह राज्यातील विरोधीपक्षनेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे रश्मी शुकला यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्याचे आदेशही राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर त्यांची राज्याचे पोलीस महासंचालक पदावरून उचलबांगडी कऱण्यात आली.
रश्मी शुक्ला यांच्या हकालपट्टीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना फडणवीसांवर ताशेरे ओढले आहेत. “पापाचा घडा भरला अन् निवडणूक आयोगालाही लाज वाटल्याने फडणवीसांच्या ‘लाडक्या ताई’ला हटवण्यात आले, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. “हे सरकारचं बेकायदेशीर असून त्यांनी बेकायदेशीर पद्धतीने अनेक नेमणुका करण्यात आल्या, ज्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल होते, ज्या अधिकाऱ्याने विरोधकांचे फोन टॅप केले, ज्या अधिकारी तुरुंगात जाण्याच्या तयारीत होत्या. त्यांना सरकार बदलताच गुन्हे काढून थेट पोलीस महासंचालकपद बहाल करण्यात आले आणि त्यांच्याकडून अनेक राजकीय गैरकृत्य करून घेण्यात आली.” असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा: “केवळ आमदारकी डोळ्यासमोर ठेवूनच ते…”; दिलीप वळसे पाटील यांची देवदत्त निकमांवर टीका
तसेच, “महाराष्ट्रासारख्या राज्याचे पोलीस महासंचालकपद हे अत्यंत प्रतिष्ठेचे आहे. महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे आणि त्या पदावर कुणाला बसवावे याचे जर भान गृहमंत्र्यांना नसेल तर त्यांना प्रशासन, राज्यव्यवस्था आणि नैतिकता कळत नाही. आम्ही निवडणूक आयोगाचे आभारी आहोत, उशीरा का होईना त्यांनी शहाणपणाचा निर्णय घेतला.” असंही त्यांनी म्हटलं आहे. पण, पंत गेले नी राव आले, असे होऊ नये, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
तसेच, “रश्मी शुक्ला यांची बदली केली असली तरी निवडणुका निपक्षपणे होतील याची अजून खात्री नाही.” अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. निवडणूक तोंडावर आली असतानाही सत्ताधाऱ्यांच्या अधिकृत सरकारी गाड्यामंधून पैशाचे वाटप सुरू आहे. पण विरोधकांच्या गाड्यांवर, घरांवर धाडी टाकल्या जात आहेत. सर्वसामान्य जनेलाही त्रास दिला आहे. पण तरीही निवडणूक आयोग मुग गिळून गप्प बसला आहे.
हेही वाचा: पुरंदरमध्ये होणार तिरंगी लढत; शिवतारेंना शह देण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठबळ?
अमेरिकेतील निवडणुकांचे उदाहरण देत संजय राऊतांनी केंद्र सरकारलाही घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेसारख्या महासत्ता देशाची निवडणूक बॅलेट पेपरवर होत आहे. तिथली जनता बॅलेट पेपरवर मतदान करत आहे. ज्यांची माणसे चंद्रावर उतरली. विज्ञानस संसोधन, आधुनिकतेत जो देश आजही पुढे आहे, तिथेही राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक बॅलेट पेपरवर होत आहे. तिथली जनताही मतपत्रिकेवर आपला अध्यक्ष निवडते, पण आमच्या निवडणूक आयोगालाच कळत नसेल तर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि विचारसरणीर प्रश्नचिन्ह कायम निर्माण होत राहिल, असा टोलही संजय राऊतांनी लगावला आहे.