माणूस आहे की हैवान? निष्पाप मुलाला लिफ्टमधून दिलं ढकलून; पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण लिफ्टमध्ये उभा आहे. तेवढ्यात एक लहान मुलगा तिथे येतो. तो लिफ्टमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो. परंतु लिफ्टमध्ये असलेला तरुण त्याला ढकलतो. पण चिमुकला पुन्हा लिफ्टमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो. यावेळीही तरुण पुन्हा मुलाला बाहेर ढकलतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दोघांमध्ये मस्ती सुरु असल्यासारखे वाटते, पण तिसऱ्या वेळी जेव्हा चिमुकला आत शिरण्याचा प्रयत्न करतो तेव्हा गंभीर घडते. लिफ्टमधील तरुण मुलाला जोरात ढकतो. यामुळे लहान मुलगा लिफ्टच्या बाहेर जमिनीवर आदळतो. लिफ्ट बंद होऊन तरुण वर एकटाच निघून जातो.
A Man pushed a Kid out of the lift🥲 pic.twitter.com/f6dln61bBL — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 16, 2026
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला असून तरुणावर कारवाईची मागणी केली आहे. तसेच चिमुकल्याला लागले तर नाही ना अशी चिंता व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्याने म्हटले की, नराधमावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, तर दुसऱ्या एका माणुसकी संपत चालली आहे असे म्हटले आहे. तिसऱ्या एका नेटकऱ्याने मुलाला काही गंभीर दुखात झाली नाही ना असा प्रश्न विचारला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






