फोटो सौजन्य - Social Media
लोकशाही जाणीव असणे काळाची गरज आहे. लोकशाहीची जाणीव नसली तर देशाचा कारोभार हळूहळू हिटलरशाहीकडे जाण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे लोकशाही कशी असते? याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे. अगदी लहान मुलांनाही लोकशाही कशी असते? काय असते? आपला नेता कसा निवडला जातो? याची एकंदरीत ओळख असणे आवश्यक आहे. यासाठी बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अंभोराने पाऊल उचलले आहे. या शाळेतील मुलांना लोकशाहीची याख्या समजावण्यासाठी चक्क निवडणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
मुळात, या संबंधित व्हिडीओ @ajay.ghodake111 ने इंस्टाग्रामवर अपलोड केले आहे. शाळेत निवडणुकीचे आयोजन करण्यात आले होते. उमेदवारीचे आयोजन करण्यात आले होते. ४ विद्यार्थ्यांनी उमेदवारीसाठी अर्ज केले होते. अर्जाची छाननी करत उमेदवारांचे अर्ज स्वीकारले होते. यानंतर निवडणुका झाल्या. शाळेतील विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी तसेच इतर कर्मचाऱ्यांनी या निवडणुकीत सहभाग घेतला. तसेच बहुतमताने ‘जानवी आमले’ या विद्यार्थिनीचा विजय झाला. शाळेच्या मुख्यमंत्री पदासाठी जानवी आमलेची बहुमताने निवड करण्यात आली. दरम्यान, या निवडणुकीत मतदान कक्ष, मतदान प्रतिनिधी आणि मतदान अधिकारीही उपस्थित ठेवण्यात आले होते. निवड होताच विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष पाहिला गेला.
पोस्टखाली कॅप्शनमध्ये ‘जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अंभोरा शाळेची मुख्यमंत्री पदाची निवडणुक पार पडली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणे, अर्जाची छाननी करणे, सूचक अनुमोदक यांच्या स्वाक्षरी, अपूर्ण अर्ज बाद करणे, अर्ज मागे घेणे, प्रचार करणे या सर्व बाबी करण्यात आल्या. मतदान कक्ष, मतदान अधिकारी, मतदान प्रतिनिधी नेमण्यात आले.शेवटी मतदान घेवून निकाल जाहीर करण्यात आला. या सर्वातून लोकशाहीच्या अनुभवातून सर्व मुले गेली.’ असे नमूद करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीसारखा उमेदवारांचा प्रचार करण्यात आला. विजयी झालेल्या उमेदवाराच्या डोळ्यामध्ये आनंदा अश्रू पाहिले गेले आहे. नंतर विद्यार्थ्यांनी मिळून केलेला जल्लोष अगदी पाहण्यासारखा होता.