File Photo : senior citizen
जालना : महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) तर्फे ११ व १२ जानेवारी रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन दिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात आले असून, त्यात विविध कार्यक्रम होणार आहेत.
हेदेखील वाचा : Panchgani Crime: पाचगणीत बारबालांचा पुन्हा धिंगाणा; 20 जणांना बेड्या, 24 लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूरच्या सावेवाडी भागातील दिवाणजी व श्याम मंगल कार्यालय परिसरात आयोजित या अधिवेशनानिमित्त शनिवारी सकाळी ९ ते १० च्या दरम्यान शोभायात्रा व ध्वजारोहण होईल. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व फेस्कॉमचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट व स्वागताध्यक्ष खा. डॉ. शिवाजीराव काळगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
अधिवेशनात मान्यवरांचा सत्कार, ज्येष्ठांचा विशेष सन्मान यासह दोन दिवस ज्येष्ठांसाठी विविध विषयांवर तज्ज्ञांची विशेष व्याख्याने तथा चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ज्येष्ठांचे आनंदी जीवन’, ‘ ज्येष्ठत्व ते श्रेष्ठत्व’, ‘ निवृत्ती म्हणजे निष्क्रयता नव्हे’ ‘फेस्कॉम काल, आज व उद्या’, ‘आरोग्यमय जीवन कसे जगावे’, ‘हृदयरोग व घ्यावयाची काळजी’, ‘ज्येष्ठांच्या कायदेविषयक समस्या आणि महिलांचे आरोग्य व कर्करोग विषयक वाढत्या समस्या’ इ. विषयांवर सखोल मार्गदर्शन लाभणार आहे.
अधिवेशनानिमित्त शनिवारी सायंकाळी स्मरणिका प्रकाशन व सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. जालना शहर व जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने या अधिवेशनातील भरगच्च कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जालना ज्येष्ठ नागरिक मंचचे पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.
21 ऑगस्ट ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन’
जगभरात 21 ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन’ म्हणून साजरा केला जातो. समाज, कुटुंब आणि राष्ट्र यांच्या सेवेसाठी ज्यांनी आपल्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण भाग व्यतीत केला, त्यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
हेदेखील वाचा : CIDCO Lottery 2025: घर घेण्याचे स्वप्न होणार साकार, फक्त २५ लाखांत घर; कुठे मिळणार? जाणून घ्या सविस्तर