कोल्हापूर : कोल्हापूर दंगलीवरून (Kolhapur Riots) आता शाहू राजे छत्रपती हे मैदानात उतरले आहेत. त्यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन करीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांवर चालण्याची आता गरज असल्याचे म्हटले आहे. सामाजिक सलोखा ही कोल्हापूरची परंपरा आहे. आज 75 वर्षे आपल्याला लोकशाहीला झाले आहेत. आता नवीन युगात राहतो, 21 व्या शतकात राहतोय, त्यामुळे अशा प्रकारचे सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम चुकीचे आहे. आशा वेळेस आपल्या पूर्वजांच्या विचार आणि त्यांची शिकवणी आपल्या डोळ्यांसमोर असणे गरजेचे आहे. असे यापूर्वी कधी झाले नव्हते
कोल्हापूरला अशा प्रकारची दंगल होणे शोभत नाही
त्यानंतर पुरोगामी विचाराच्या कोल्हापूरला अशा प्रकारची दंगल होणे, हे या शहराला शोभत नाही. या सर्व गोष्टीच्या मुळापर्यंत जाणे गरजेचे, त्याचे कारण काय हे शोधणं गरजेचे आहे. या प्रकरणाकडे सायक्लोजी पद्धतीने पाहिले पाहिजे. सर्वांनी सामाजिक सलोख्याने राहिले पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सर्वात पहिले सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी शासनाची आणि गृहखात्याची असते. त्यांनी या संबंधित सर्व रिपोर्ट घेतले पाहिजे आणि अशा घटना परत होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. संभाजीनगर, नाशिक आता कोल्हापूर याचा अभ्यास करून याची लिंक आहे, की सर्व वेगवेगळ्या आहेत का याकडे पाहिले पाहिजे. पोलिसांनी आता यापुढे सतर्क राहिले पाहिजे. प्रत्येकाने शांतता कायम राहील यासाठी प्रत्येकाने तसे वागले पाहिजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांवर चालण्याची गरज आहे. लोकशाहीमध्ये सुराज्य आणायचे असेल तर तसे सर्वांनी एक दिलाने राहिले पाहिजे, असेसुद्धा त्यांनी सांगितले.
या कारणाने पेटली दंगल
कोल्हापूरमध्ये शहरातील सात तरुणांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे फोटो ठेवले आणि इथंच वादाची ठिणगी पडली. त्यामुळे कोल्हापूरचे वातावरण चिघळले, लोकं रस्त्यावर उतरली होती. कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रित येत आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांकडे (Police) मागितली होती. परंतु, काही समाज कंटकांनी त्या आंदोलनाला गालबोट लावत दगडफेक करीत, वातावरण चिघळवले. परंतु पोलिसांनी कडक कारवाई करीत दंगल पांगवली आहे. या दंगलीचे पडसाद सर्वंत्र उमटत आहेत. तसेच आज कोल्हापूरमध्ये इंटरनेट सेवा (Internet service) बंद करण्यात आली आहे. मात्र या दंगलीनंतर अनेक संतप्त प्रतिक्रिया सर्व क्षेत्रातून येत असताना, आता या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
कोल्हापूरमधील राड्याप्रकरणी 36 जणांना अटक