Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News : शेवगाव दुय्यम निबंधक कार्यालयात लाचखोरीचा बाजार; भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वरिष्ठांचा वरदहस्त?

शेवगाव दुय्यम निबंधक कार्यालयात लाचखोरीचा बाजार सुरू असल्याचे आरोप समोर येत असून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वरिष्ठांचा वरदहस्त असल्याची चर्चा रंगली आहे. कामासाठी नागरिकांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारींमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 09, 2026 | 03:24 PM
शेवगाव दुय्यम निबंधक कार्यालयात लाचखोरीचा बाजार; भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वरिष्ठांचा वरदहस्त?

शेवगाव दुय्यम निबंधक कार्यालयात लाचखोरीचा बाजार; भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वरिष्ठांचा वरदहस्त?

Follow Us
Follow Us:
  • शेवगाव दुय्यम निबंधक कार्यालयात लाचखोरीचा बाजार
  • भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वरिष्ठांचा वरदहस्त?
  • नेमके प्रकरण काय?
पोपट पिटेकर, अहिल्यानगर : शेवगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कारभार सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शासनाचा महसूल बुडवून आणि तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून अवैध दस्त नोंदणी केल्याप्रकरणी दुय्यम निबंधक डी. डी. लंगोटे यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार असतानाच, आता या प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे. भ्रष्ट कारभाराचा हा पैसा थेट वरपर्यंत जात असल्याचे खळबळजनक वास्तव समोर येत आहे.

नेमके प्रकरण काय?

शेवगावचे दुय्यम निबंधक लंगोटे हे पदाचा गैरवापर करून सामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचा आरोप शेवगाव तालुका वडार समाजाचे अध्यक्ष अशोक धनवडे यांनी केला आहे. ४२ ब आणि ४२ ड नुसार शेतजमिनीच्या तुकड्यांची नोंदणी करण्यास बंदी असतानाही, केवळ आर्थिक लाभासाठी येथे सर्रास अवैध दस्त नोंदवले जात आहेत. फॉरेस्ट जमिनी आणि सरकारी निर्बंध असलेल्या जमिनींचे मूल्यांकन कमी दाखवून शासनाचा मोठा महसूल बुडवला जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Chandrapur News: राजुरा-आसिफाबाद मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात, वाहतुकीची समस्या गंभीर; नागरिकांकडून कारवाईची मागणी

वरिष्ठांचे ‘तारीख पे तारीख’ धोरण

या गंभीर आरोपांनंतर लंगोटे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कोणतीही ठोस प्रतिक्रिया न देता “आमच्या सरांची प्रतिक्रिया घ्या” असे सांगून हात झटकले. जेव्हा ‘नवराष्ट्र’ने या प्रकरणाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनद्वारे संपर्क साधला, तेव्हा त्यांनी “अहवाल मागवला आहे, तो आल्यावर कारवाई करू” असे मोघम उत्तर दिले. गेल्या अनेक दिवसांपासून वरिष्ठांकडून केवळ ‘अहवाल’चे कारण पुढे केले जात असल्याने, ही कारवाई टाळण्याचा किंवा वेळ मारून नेण्याचा प्रयत्न तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हप्तेखोरीचे ‘कनेक्शन’ थेट जिल्ह्यापर्यंत?

एकीकडे वरिष्ठ कारवाईचे आश्वासन देत असतानाच, विभागातील एका कर्मचाऱ्याने ‘नवराष्ट्र’शी बोलताना धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. “प्रत्येक तालुक्यातून दरमहा मोठा आर्थिक वाटा (हप्ता) वरिष्ठांना पुरवला जातो,” असे या कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. जर हे खरे असेल, तर खालच्या स्तरावर चालणाऱ्या भ्रष्टाचाराला वरिष्ठांचेच पाठबळ असल्याचे स्पष्ट होत आहे.

आझाद मैदानावर उपोषणाचा इशारा

धनवडे यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे दाद मागितली आहे. येत्या दोन महिन्यांत संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. आता या प्रकरणावर राज्य सरकार काय भूमिका घेते आणि भ्रष्टाचाराची ही साखळी तोडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mira Bhayandar News: ‘आठवा अजूबा’ ब्रीजवर पुन्हा वाद; नवराष्ट्रच्या बातमीनंतर मनसे प्रशासनाला धारेवर धरणार

Web Title: Shevgaon sub registrar office bribery allegations corruption ahilyanagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • ahmednagar
  • maharashtra
  • Shevgaon

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात
1

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
2

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती
3

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू
4

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.