छ. संभाजीनगर : मुख्यमंत्र्यांनी (CM) मराठवाडा मुक्ती संग्राम सभेला (Marathwada Mukti Sangram Sabha) अवघा १३ मिनिटे वेळ दिला. गौरव यात्रेला विरोध नाही पण दुटप्पी राजकारणाला आमचा विरोध आहे. शिवरायांचा अवमान झाला तेव्हा मूग गिळून गप्प बसलात. सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) म्हणतं हे नपुंसक सरकार हे मत दुर्देवी.
शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढे हे सरकार नमलं नाही हे सरकार शेतकऱ्यांची थट्टा करतंय का? या सरकारचा पायगुण चांगला नाही. आम्ही प्रत्येक वंचिताचा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. जनाची नाही पण मनाची लाज वाटू द्या.
[read_also content=”असं कसं! नागरिकांना चप्पल बाहेर काढूनच प्रवेश, अधिकारी मात्र चप्पल घालूनच कार्यालयात बसणार? जनतेसोबत भेदभाव करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा – शिवाजी आव्हाड https://www.navarashtra.com/maharashtra/citizens-enter-by-taking-off-their-shoes-or-chapples-but-officials-will-sit-in-the-office-with-shoes-or-chapples-take-action-against-employees-who-discriminate-against-public-shivaji-awhad-nrvb-380412.html”]
अवकाळीचे, पीक विम्याचे, कांद्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत.सर्वधर्म समभाव जपणारा हा मराठवाडा आहे. तुमच्यात धमक असेल तर सावकरांना ताबडतोब भारतरत्न द्या. महागाई, बेरोजगारीवरचं लक्ष हटविण्यासाठी वेगळे मुद्दे पेटवले जातात.
[read_also content=”‘उद्धव ठाकरे मोठ्या मनाचे नेते, त्यांच्याएवढा भला माणूस…’; अशोक चव्हाणांकडून कौतुकाचा वर्षाव https://www.navarashtra.com/maharashtra/uddhav-thackeray-is-a-big-hearted-leader-as-good-a-man-says-congress-leader-ashok-chavan-nrka-380418.html”]