रायगडाच्या मंत्रिपदासाठी भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा अजित पवार गटाचा आरोप (फोटो - सोशल मीडिया)
Bharat Gogawale Aghori Pooja : मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणूका होऊन आणि महायुतीचे सरकार येऊन अर्धै वर्षे उलटून गेले आहे. मात्र नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा मुद्दा अद्याप निकाली निघालेला नाही. दरम्यान, राज्यामध्ये अंधश्रद्धा निर्मलून कायदा लागू असताना सत्ताधारी आमदारांनी केलेल्या अघोरी पुजेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचे नेते व मंत्री भरत गोगावले यांच्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये ते अघोरी विद्या करुन पूजा करताना दिसत आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
रायगडाच्या पालकमंत्री पदावरुन शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून आले आहे. मंत्री भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे यांच्यामध्ये वाद सुरु असताना गोगावले यांनी पालकमंत्रिपदासाठी अघोरी पूजा केल्याचा आरोप केला जातो आहे. महायुतीमधील नेत्यानेच याबाबत गंभीर आरोप करुन भरत गोगावले यांची व्हिडिओ शेअर केली आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, बाबा भरतशेठ +आघोरी विद्या = पालकमंत्री ?? असा सवाल सूरज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या भरत गोगावले यांच्या व्हिडिओमध्ये ते अघोरी पूजा करत असल्याचे दिसत आहे. यामध्ये त्यांनी सिंहासारखे आसन असलेल्या मोठ्या खुर्चीवर बसलेले दिसून येत आहे. यावेळी त्यांच्यासमोर काही भस्म लावलेले आणि जटाधारी साधू दिसून येत आहेत. हे साधू कोणतीतरी मंत्र साधना करत असल्याचे दिसत आहे. तसेच आजूबाजूला आणखी काही साधू भगवाधारी कपड्यांमध्ये देखील दिसत आहे.
मंत्री भरत गोगावले यांची अघोरी पूजा करताना फोटो समोर आला
त्याचबरोबर या पूजेचा एक व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटातील पुण्याचे नेते वसंत मोरे यांनी देखील शेअर होता. यामध्ये त्यांनी सत्तेमधील नेते अघोरी पूजा करत असल्याचा आरोप केला होता. यानंतर आता सत्तेमधील नेत्यांनीच भरत गोगावले यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिंदे गटाचे नेते व मंत्री भरत गोगावले यांनी अघोरी पूजेचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. ‘मी कोणतीही अघोरी पूजा केलेली नाही. माइय्य धरी अनेक साधू आणि संत येतात, हा व्हिडिओ त्याचाच आहे. तो चुकीच्या पद्धतीने सादर केला जात आहे,’ असं भरत गोगावले यांनी म्हटलं होतं.