Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambadas Danve News: शिंदे गटाचा आमदार, नोटांचा ढिग, व्हिडिओ व्हायरल; अंबादास दानवेंचा ‘कॅश बॉम्ब’ Video

अंबादास दानवे यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी पैशांच्या गड्ड्यां मोजताना दिसत आहेत. पण या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 09, 2025 | 09:52 AM
Ambadas Danve News:

Ambadas Danve News:

Follow Us
Close
Follow Us:
  •  हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस
  •  अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर
  • शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी पैशांच्या गड्ड्यां मोजताना दिसत आहेत.
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. पण दुसऱ्याच दिवशी राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. पैशांच्या गड्ड्यांसह एक आमदाक काय करत आहे. असा सवाल त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांना विचारला आहे. अंबादास दानवे यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी पैशांच्या गड्ड्यां मोजताना दिसत आहेत. पण या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

अंबादास दानवे यांनी त्यांच्या ट्विटर एक्स अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत राज्य सरकारवर निशाणा साधला. या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमापीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे. जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?ट असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

इस्कॉन मंदिरात ‘ही- मॅन’ ला वाहिली श्रद्धांजली; ९० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला संगीत कार्यक्रम

या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे!
जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?@mieknathshinde @Dev_Fadnavis @AmitShah @BJP4Maharashtra #Moneypower #ruins #Maharashtra pic.twitter.com/WUDpmedTgo
— Ambadas Danve (@iambadasdanve) December 9, 2025

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अंबादास दानवे एका वृत्तवाहिनीशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, सत्ताधारी पक्षातील काही आमदार त्यात दिसत आहेत. या नोटांच्या गड्ड्या कुणाच्या आहेत, काय आहेत, याची चौकशी झाली पाहिजे, मी याबाबत तक्रार करणार आहे. मी यात कुणाचेही नाव घेतलेले नाही. पण पोलिसांनी या व्हिडीओची चौकशी केली, पाहिजे, अशी मागणीही दानवे यांनी केली आहे.

Jalgaon Crime: विद्यार्थिनींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधण्यास भाग पाडले; शाळेच्या मुख्याध्यापक आणि आठ

दरम्यान, या व्हायरल व्हिडीओवर शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रीया दिली आहे. गोगावले म्हणाले की, त्या व्हिडीओमध्ये कोणता आमदार आहे, किती बंडलं आहेत, हे आम्ही आतापर्यंत पाहिलेले नाही, आम्हाला हे व्हिडिओ तपासायचे आहेत. कोण आमदार आहे, किती बंडल आहेत आणि हे पैसे कोणत्या संदर्भात आहेत, हे समजणे गरजेचे आहे,” असे त्यांनी म्हटले. दानवे सतत तक्रारी करत असल्याचे सांगत, त्यांच्याकडे सध्या कोणतेही पद नसल्याने “कदाचित त्यांची शोध मोहीम सुरू असावी,” अशी टीकाही त्यांनी केली.

अंबादास दानवे यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपला टॅग करून सरकारकडून स्पष्ट उत्तर देण्याची मागणी केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी हा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता असून विरोधक सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करू शकतात.

Web Title: Shinde group mla pile of notes video goes viral ambadas danves cash bomb video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 09:24 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘आपली ताकद किती? MVA म्हणून…’; ठाकरेंच्या बैठकीत नेमके काय घडले?
1

Maharashtra Politics: ‘आपली ताकद किती? MVA म्हणून…’; ठाकरेंच्या बैठकीत नेमके काय घडले?

Maharashtra Politics : पुत्र प्रेमापोटी कोकणातील ‘या’ नेत्याला डावललं? विरोधी पक्षनेतेपदावरून ठाकरे गट पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर
2

Maharashtra Politics : पुत्र प्रेमापोटी कोकणातील ‘या’ नेत्याला डावललं? विरोधी पक्षनेतेपदावरून ठाकरे गट पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर

Mahendra Dalvi Replied Ambadas Danve: तो मीच आहे का? अंबादास दानवेंच्या आरोपाला महेंद्र दळवींचा पलटवार
3

Mahendra Dalvi Replied Ambadas Danve: तो मीच आहे का? अंबादास दानवेंच्या आरोपाला महेंद्र दळवींचा पलटवार

Maharashtra Politics: “शिंदेंच्या आमदारांना घेऊन काय…”; ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांचा पलटवार
4

Maharashtra Politics: “शिंदेंच्या आमदारांना घेऊन काय…”; ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.