Pune Municipal Election 2026: पुण्यात ठाकरेंच्या गडाला सुरूंग; अधिकृत उमेदवारांचाच भाजपमध्ये प्रवेश
कोथरूड प्रभाग ९ मधील ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार महेश सुतार आणि पूजा सुतार आणि सुखदेव तापकीर यांनी भाजपात प्रवेश केला. तर प्रभाग क्रमांक ११ मधील ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब धनवडे, विद्यार्थी सेनेचे अमर गायकवाड आणि माजी नगरसेवक पैलवान दिलीपदादा गायकवाड यांनीही आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करत महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला.
Maharashtra Politics : शहराच्या विकासाचा अजेंडा गायब, निवडणुकीत प्रचाराची पातळी घसरली; व्यक्तिगत
चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे येथील आपल्या निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सर्व नूतन सदस्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना त्यांनी भाजपच्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला. “भाजपचे दोन उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. आता या महत्त्वाच्या पक्षप्रवेशांमुळे भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे. ही केवळ सुरुवात असून, आगामी काळात भाजप महापालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवेल,” असे चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले. या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपचे उमेदवार लहू बालवडकर, गणेश कळमकर, रोहिणी चिमटे, अजय मारणे, अभिजीत राऊत यांच्यासह डॉ. संदीप बुटाला, प्रकाशतात्या बालवडकर तसेच इतर प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर उबाठा गटाच्या उमेदवारांनीच पक्षाला रामराम ठोकल्याने संबंधित प्रभागांमध्ये भाजपची स्थिती अधिक भक्कम झाली आहे. या घडामोडींमुळे निवडणूक रणांगणात भाजपचे पारडे जड झाल्याचे चित्र स्पष्ट होत असून, महापालिका निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Vilasrao Deshmukh : लिहिलेले पुसता येतं, पण कोरलेलं नाही! वडिलांवर टीका करताच देशमुख बंधू आक्रमक
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर आता निवडणूक प्रक्रियेतील पुढील टप्प्यांचे चित्र स्पष्ट झाले आहे. अर्जमाघारीची मुदत उलटून गेल्यामुळे ईव्हीएमवर ठाकरे गटाच्या उमेदवारांची नावे कायम राहणार आहेत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदारांना संबंधित उमेदवारांच्या नावासमोर ‘मशाल’ हे चिन्ह आणि मतदानाचा पर्याय उपलब्ध असणार आहे.
मात्र, प्रत्यक्ष प्रचाराच्या उर्वरित काळात वेगळेच चित्र पाहायला मिळणार आहे. पक्षांतर केलेले उमेदवार मतदारांमध्ये “भाजपला मतदान करा, आमच्या नावासमोरील किंवा मशाल चिन्हापुढील बटण दाबू नका,” असे आवाहन करत प्रचार करताना दिसण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असून, निवडणूक प्रचार अधिकच रंगतदार होणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. अर्जमाघारीनंतर निर्माण झालेल्या या अनोख्या स्थितीचा निकालावर नेमका काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






