Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या दिवशी हिंदूंना प्रवेशबंदी, दोन्ही शिवसेना आणि भाजपकडून घंटानाद आंदोलन

कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या दिवशी हिंदूंना प्रवेश दिला जात नाही. याचाच निषेध म्हणून शिवसेना, शिवसेना उबाठा आणि भाजप कडून घंटानाद आंदोलन करण्यात आले. बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी जिल्हा प्रशासनाकडून बंदी घातली जाते.

  • By विवेक
Updated On: May 28, 2026 | 05:23 PM
Shivsena, Shivsena UBt and BJP protest on Durgadi fort at Kalyan, protest on Durgadi fort at Kalyan, , Durgadi fort, Bakri Eid,

Shivsena, Shivsena UBt and BJP protest on Durgadi fort at Kalyan, protest on Durgadi fort at Kalyan, , Durgadi fort, Bakri Eid,

Follow Us
Follow Us:

गेल्या चाळीस वर्षांहुन अधिक काळ धगधगत असलेला कल्याणच्या दुर्गाडी किल्यावरील वाद आता पुन्हा उफाळून आला आहे. बकरी ईद सणाच्या निमिताने पुन्हा एकदा हा वाद पेटला असून ऐतिहासिक अश्या दुर्गाडी किल्ल्यावर धार्मिक तणाव पसरू नये यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हिंदू भाविकांना बकरी ईदच्या दिवशी बंदी घातली आहे. आजच्या दिवशी किल्यावरील मंदिरात हिंदूंना प्रवेशबंदी करण्यात आली असून दुसरीकडे वर्षातील इतर दिवशी दुर्गाडी किल्ला परिसरात कोणत्याही प्रकारच्या इस्लामी उपासनेला मनाई करण्यात आली आहे. यामुळेच, प्रशासनाचा विरोध करत शिवसेना, शिवसेना उबाठा आणि भाजपकडून आंदोलन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या दिवशी हिंदूंना प्रवेश दिला जात नाही. याचाच निषेध म्हणून शिवसेना, शिवसेना उबाठा आणि भाजप कडून घंटानाद आंदोलन करण्यात आले. बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी जिल्हा प्रशासनाकडून बंदी घातली जाते. बंदीच्या या निर्णयाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आधीपासूनच विरोध दर्शविला होता. गेल्या चाळीस वर्षांहुन अधिक काळ हा विषय धगधगत आहे.

१९८२ पासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध दर्शवल्यानंतर आनंद दिघे यांनी याच ठिकाणी घंटानाद आंदोलन सुरू केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात या आंदोलनाची परंपरा कायम ठेवली. आज.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी दुर्गाडी परिसरात आक्रमकपणे आंदोलन केले. ‘आमच्या मंदिरात दर्शन घेणं हा आस्थेचा विषय आहेच मात्र तो प्रत्येक हिंदूचा संविधानिक हक्क आहे.’ अशा शब्दात शिवसैनिकांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या भावना बोलून दाखवत या बंदीच्या विरोधात जोरदार घंटानाद आंदोलन केले.

आज (गुरुवार, २८ मे) सकाळी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून दुर्गाडी किल्ल्यावर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्तेसुद्धा दुर्गाडी किल्ला परिसरात जमले. त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. काही कार्यकर्त्यांनी पोलिसांनी लावलेल्या बॅरीकेड्सवर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हा प्रयत्न रोखला. यावेळी शिवसेना भाजपच्या नेत्यांसह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

“पंतप्रधान मोदी ‘पनौती’ तर मुख्यमंत्री फडणवीस ‘खोटारडे’,” हर्षवर्धन सपकाळ यांचे पुन्हा वादग्रस्त विधान

नक्की वाद काय ?

कल्याणमधील दुर्गाडी हा ऐतिहासिक केला प्रसिद्ध आहे. या किल्ल्यावर दुर्गा देवीचं मंदिर आहे तर किल्याच्या पायथ्याशी मुस्लिम बांधवांचं धार्मिक स्थळ आहे. गेल्या अनेक दशकांपासून या जागेवरून दोन्ही समाजात वाद सुरु आहेत. या परिसरात ईदच्या दिवशी नामज पठण करण्यासाठी रस्ते अडवले जातात तसेच मंदिरात प्रवेश दिला जात नाही, असा आरोप करण्यात येतो. म्हणूनच गेल्या अनेक वर्षांपासून या दिवशी मंदिर प्रवेश देण्याबाबत शिवसेना तसेच हिंदुत्ववादी संघटना यांच्याकडून आंदोलन करण्यात येते. यावर्षीदेखील शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट आणि भाजपकडून प्रशासनावर दबाव आणत आंदोलनाची हाक देण्यात आली.

भाजप संघटनेत मोठे फेरबदल; पंजाब, हरियाणासह ‘या’ चार राज्यांतील प्रदेशाध्यक्ष बदलले

Web Title: Shivsena shivsena ubt and bjp protest on durgadi fort at kalyan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • Bakri Eid
  • BJP
  • kalyan news
  • shivsena
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

40 कोटींच्या कर्ज घोटाळा प्रकरणात भाजप आमदाराच्या भावाला उच्च न्यायालयाचा झटका; दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला!
1

40 कोटींच्या कर्ज घोटाळा प्रकरणात भाजप आमदाराच्या भावाला उच्च न्यायालयाचा झटका; दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला!

Chandrakant Patil : ‘EVM असो वा बॅलेट पेपर, जिंकणार आम्हीच!’ चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना टोला
2

Chandrakant Patil : ‘EVM असो वा बॅलेट पेपर, जिंकणार आम्हीच!’ चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना टोला

Nagpur News :भाजप नेत्यांचा १०० कोटींचा गरबा ;दुष्काळावरून लोंढे यांचा सरकारवर हल्लाबोल
3

Nagpur News :भाजप नेत्यांचा १०० कोटींचा गरबा ;दुष्काळावरून लोंढे यांचा सरकारवर हल्लाबोल

Sanjay Raut : सहा महिन्यांत मोदी सरकार कोसळणार? संजय राऊतांचा मोठा दावा; मोदींच्या जागी कोण येणार, राऊतांनी दिले संकेत
4

Sanjay Raut : सहा महिन्यांत मोदी सरकार कोसळणार? संजय राऊतांचा मोठा दावा; मोदींच्या जागी कोण येणार, राऊतांनी दिले संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.