ठाणे : काल ठाण्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सभा झाली. या सभेत सभेत राज ठाकरेंचा सत्कार करण्यात आला होता. त्यांना भगवी शाल देण्यात आली होती आणि नंतर लगेचच तलवारही देण्यात आली. भेट दिलेली तलवार राज ठाकरेंनी सभेला दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मनसे नेते अविाश जाधव यांनी प्रतिक्रीया दिली असून तलवार दाखवणे ही एक प्रकारची संस्कृती असल्याचं म्हणाले आहे.
जर राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल व्हायलाच हवा, तलवार दाखवणे ही एक प्रकारची संस्कृती आहे, त्यामुळे जर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरायला लावू नका असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. दरम्यान, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टिकेवरही अविनाश जाधव यांनी उत्तर दिलं आहे. मग आम्ही जर म्हणालो की त्यांच्या नेत्यांचा चेहरा म्हशीचा कोणत्या भागात सारखा दिसतो, तर हे काय बोलणार, पण आम्ही असे बोलत नाही कारण आमच्या संस्कृतीत ते बसत नाहीत.
[read_also content=”राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, ठाण्याच्या सभेत तलवार दाखवणं भोवलं https://www.navarashtra.com/maharashtra/kokan/case-registered-against-raj-thackeray-for-showinh-sword-in-thane-nrps-268395.html”]
मुंब्रा मध्ये आतापर्यंत दोन ते तीन घटना झाल्याचे आव्हाड म्हणाले, मात्र या दोन ते तीन घटनांमध्ये किती लोक मेले हे आव्हाडांना माहित नाही का, आणि फक्त दोन ते तीन मिनिटाला आणखीन किती घटना व्हायला पाहिजे, असे आव्हाड यांना वाटतय, आम्ही अजून सव्वीस अकरा देखील विसरलो नाही असं ते म्हणाले.
मशिंदीवरील भोंग्याबाबत वक्तव्य
राज साहेबांचा आदेश काहीही झालं तरी पाळला जाणार, जर ते म्हणाले की भोंगे उतरणार नाही आणि डेसिबल ची मर्यादा पाळत तर आम्ही देखील त्यांच्या समोर भोंगे लावणार आणि डेसिबलच्या मर्यादेत भोंगे वाजवणार असवल्याचंही ते म्हणाले.
[read_also content=”नवी मुंबईचे भाजपा नेते आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ; लैंगिक शोषणाचे आरोपांची चौकशी होणार https://www.navarashtra.com/crime/navi-mumbai-bjp-leader-mla-ganesh-naiks-troubles-increase-allegations-of-sexual-harassment-will-be-investigated-268457.html”]