फोटो सौजन्य: गुगल
सिंधुदुर्ग: गणपतीच्या सणाला चाकरमान्यांची कोकणात जाण्यासाठी लगबग सुरु होते. याचपार्श्वभूमीवर आता रेल्वे प्रवासी संघ कोकण वासियांसाठी पुढे सरसावला आहे. जिल्ह्यात लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना सिंधुदुर्ग स्थानक आणि जिल्ह्यातील वेगवगेळ्या स्थानकांवर थांबा मिळावा यासाठी प्रवासी संघटनेचे रेल्वेस्थानकावर जनआंदोलन केले आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्या स्थानकावर थांबत नसतील तर हा आमच्या सिंधुदुर्ग आणि कोकण वासियांवर अन्याय आहे. परराज्यातून जाणाऱ्या गाड्या सिंधुदुर्गात थांबाव्यात अशी मागणी रेल्वेप्रवासी समितीच्या वतीने केली जात आहे.
मडूरा ते दादर आणि सावंतवाडी सी एस टी एम या नवीन गाड्या २० ऑगस्ट पूर्वी सुरू कराव्यात, या मागणीवर रेल्वे बोर्ड आणि रेल्वे प्रशासन दखल घेत नसेल तर नाईलजास्तव आम्हाला रेल्वे ट्रॅक आमच्या जिल्ह्यातून बंद करावा लागेल असा इशाराचं प्रवाशी संघटनेने कोकणरेल्वे प्रशासनाला दिला आहे. या न्याय प्रश्नाबाबत योग्यतो तोडगा न निघालयाने आज शुक्रवार १ ऑगष्टचे रेल्वेसंघर्ष समितीच्या मार्फत जन आंदोलन होणारच यासाठी सर्व सरपंच रिक्षा संघटना ग्रामस्थ प्रवाशांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष व समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर व जिल्हा समन्वय नंदन वेंगुर्लेकर यांनी जाहीर केले.
सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या या प्रश्नाबाबत कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक शैलेश बापट यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी खारेपाटण ते मडूरा रेल्वेच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली यात विविध प्रश्नावर अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नादुरुस्त रस्ते, त्यात स्टेशनमास्तर फक्त ड्युटी बघतात. रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या होणाऱ्या गौरसोयींकडे खुलेआम दुर्लक्ष केलं जात आहे. त्याचबरोबर खारेपाटण रेल्वेस्थानकाच्या उंचीबाबतच्या कामकाजाकडे डोळेझाक केली जात आहे. यावरुन रेल्वेप्रशासनाचा निष्काळजीपणा समोर येत आहे.
कोकणातून परराज्यात जाणाऱ्या १५ ते २० गाडया सिंधुदुर्गात थांबत नाहीत ही अत्यंत खेदाची बाब आहे. गणपती स्पेशल गाडया काही दिवसांपूर्वी सुरु होऊनही तिकीट मिळत नाही. याचपार्श्वभूमीवर कोकणातून परराज्यात जाणाऱ्या गाड्यांना सिंधुदुर्ग आणि जिल्ह्यातील इतर स्थानकात थांबा मिळायलाच हवा ही बाब कोकण रेल्वेने लक्षात घ्यायला हवी याबाबत रेल्वेस्थानकावर जनआंदोलन केलं आहे. कोकण हा पर्यटनच्या दृष्टीने महत्वाचे केंद्र आहे. जर कोकणात येणाऱ्या प्रवाशांना योग्य त्या सोयी सुविधा पुरविल्या तर कोकणाचा आर्थिक आणि पर्यटमनाच्या दृष्टीने विकास होण्यास मदतच होईल, असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आला आहे.