सोलापूरमध्ये महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले (फोटो- टीम नवराष्ट्र)
सोलापूर/ शेखर गोतसुर्वे: महाराष्ट्र विधानसभेच्या रणसंग्रामात सोलापूर जिल्ह्यातील रणांगणांत अपक्षांनी दंड थोपटल्याने महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीच्या विजयी जागेवर बंडखोरी केल्यामूळे अपक्ष उमेदवारांनी डोकेदुखी वाढवली आहे .११ विधानसभा मतदार संघात जातीय समीकरणानुसार चुरशीने मतदान करण्यात आले. यात प्रामुख्याने सोलापूर शहर मध्य, दक्षिण सोलापूर,शहर उत्तर विधान सभा मतदार संघाचा समावेश आहे. भाजपाचा कट्टर मतदार हा दक्षिण मतदार संघात विभागला गेला. लिंगायात,धनगर,मतांचे प्राबल्य आहे .
माञ मराठा, मुस्लिम, दलित मते निर्णणायक ठरणार आहे .धर्मराज काडादी दक्षिण सोलापूर, रणजीतसिंह शिंदे माढा,संजयमामा शिंदे करमाळा, भाजपा बंडखोर शोभा बनशेट्टी या अपक्ष उमेदवारांनी मतांचे गणित बिघडवली आहेत. शहर उत्तर मतदारसंघात भाजपाचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमूख यांच्या विरोधात शरदपवार गटाचे माजी महापौर महेश कोठे आणि अपक्ष उमेदवार शोभा बनशेट्टी यांनी तगडी फाईट दिली आहे. शहर मध्य मध्ये भाजपा आणि माकपचे वादावादी मतदारां समोर मांडण्यात आली. काँग्रेस भाजपा आणि एमआयएम मध्ये लढत होत आहे. तर दक्षिण मध्ये महाविकास आघाडी उबाठा गटाचे उमेदवार अमर पाटील यांच्या विरोधातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना माजीकेंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे खा. प्रणिती शिंदे यांनी पाठींबा दिल्याने शिवसेना काँग्रेसचा वाद विकोपाला पोहचला आहे.
बार्शीत शिवसेना विरुध्द शिवसेना आशी लढत होत असून मराठा मते निर्णाणयक ठरणार आहे .पंढरपूरात महा विकास आघाडीचे उमेदवार आमने सामने आले आहेेत . भगीरथ भालके काँग्रेस तर शरद पवार गटातून अनिल सावंत यांना उमेदवारी दिल्याने मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे .सांगोल्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत होत असताना शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांची शिट लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माळशिरस मध्ये दुरंगी थेट लढत होत आहे. भाजपाचे राम सातपुते विरुध्द शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांची कडवी झुंज आहे . मोहोळ राखीव मतदार संघात शरद पवार विरुध्द अजित पवार गट लढत होत आहे . अनगर अपर तहसीलदार कार्यालय आणि मराठा फॅक्टर मतदार संघात चालणार असल्याची चर्चा आहे .