चिखली : तिरोडा तालुक्यातील (Tiroda taluka) बेटाटी खुर्द (Betati Khurd) येथे सासुरवाडीत आल्यानंतर सासऱ्याने समजूत घातल्याने नाराज झालेल्या जावयाने चाकूने भोसकून सासऱ्याचा खून (Javaya stabbed his father-in-law to death) केला होता. ही घटना २० जुलै २०१९ रोजी घडली होती. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने (District Court) आरोपी जावई राजकुमार उर्फ सुरेश हंसराज भुरे याला आजन्म कारावासाची शिक्षा (Life imprisonment) सुनावली.
बेलाटी खुर्द येथील मनोहर तुमसरे यांची मुलगी सीमा हिचे लग्न भंडारा जिल्ह्यातील ढिवरटोली, सिंदपुरी येथील राजकुमार उफई सुरेश हंसराज भूरे याच्याशी झाले होते. सीमा आणि तिचा पती १५ दिवसांपासून बेलाटी खुर्द येथे आले होते. राजकुमार भूरे दारु पिऊन सीमाला शिवीगाळ करून मारहाण करत होता. सीमाची आई जयवंता तुमसरे आणि वडील मनोहर तुमसरे यांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र राजकुमार त्यांचे ऐकत नव्हता.
२० जुलै २०१९ च्या रात्री सर्व झोपले असताना आरोपी राजकुमारने राग मनात धरून सासरा मनोहर यादव तुमसरे यांना चाकूने भोसकले. यात त्यांचा मृत्यू झाला. याची तक्रार जयवंती तुमसरे यांनी तिरोडा पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन ढोके यांनी तपास करत न्यायालयात प्रकरण दाखल केले. तदर्थ सत्र न्यायाधीश गोंदिया यांनी ११ जुलै रोजी दोन्ही बाजू ऐकून घेवून आरोपीला आजन्म कारावास आणि ३ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त शिक्षा ठोठावली. न्यायालयात सरकार तर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड चांदवाणी यांनी बाजू मांडली. या प्रकरणी ठाणेदार योगेश पारधी आणि पोलिस हवालदार सहारे यांनी सहकार्य केले.