पुण्यात एस टी बसची पादचाऱ्याला धडक; एकाचा जागीच मृत्यू (फोटो सौजन्य-एएनआय)
पुण्यात अपघाताचे सत्र सुरुच असून आज (23 जून) एसटीची पादऱ्याला धडक लागल्याने 40 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात वाघोलीत पुणे नगर महामार्गावर एसबीआय बँकेसमोर सकाळी 12.15 च्या सुमारास घडली. राजगुरुनगर ते पैठण ही बस होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो पादचारीपुणे नगर महामार्ग ओलांडला होता. राजगुरुनगर ते पैठण बस नगरच्या दिशेने जात होती. याचदरम्यानव एसटी बसची पादचाऱ्याला धडक बसली. मागील चाकाखाली आल्याने 40 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या ठिकाणी रक्ताचा सडाच पडला होता. अपघाताची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस व लोणीकंद वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
या अपघाता दरम्यान मृत व्यक्तीला पुण्यातील ससून हॉस्पिटला हलवूण बस ही रस्त्यावरुन हटविण्यात आली या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. बस हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. पोलिसांनी रक्त सांडल्या भागावर माती टाकली. यानंतर पाण्याच्या टँकर च्या सहाय्याने तो भाग धुवून घेतला.
लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर हे अपघातस्थळी पोहोचले. अपघातानंतर बस चालक फरार झाला होता. मात्र त्यानंतर तो पोलीस स्टेशन आला. वाहतूक कर्मचारी जितेंद्र पवार, स्वप्नील गालफाडे व अन्य कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली.