Photo Credit- Social Mediaबारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींचा अजब कारभार
बारामती : बारामती पंचायत समितीमधील अधिकारी व तालुक्यातील ९९ ग्रामपंचायत पैकी ५३ ग्रामपंचायत मधील ग्रामपंचायत अधिकारी यांनी संगनमताने बेकायदेशीरपणे शासन विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची मर्जीतल्या एका-एका व्यक्तीची चार-चार ठिकाणी नेमणूक करून पात्र सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना वंचित ठेवून अन्याय केल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते पोपट धवडे यांनी विविध पुराव्यांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.यासंदर्भात गटविकास अधिकारी अनिल बागल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
Purandar airport project: जमीन आमच्या हक्काची; विमानतळ प्रकल्प हद्दपार करण्यासाठी गावकरी आक्रमक
या तक्रारीनंतर चौकशी समिती नेमून या गंभीर प्रकाराची चौकशी झाल्यास बारामती तालुक्यातील छोट्या माशापासून अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने कर्मचाऱ्यांनी शासकीय निधी लाटण्याचा पराक्रम कर्मचारी वर्गाला चांगलाच भोवणार आहे. बारामती तालुक्यातील अंजनगाव, भिलारवाडी, घाडगेवाडी, खंडोबाची वाडी, जैनकवाडी,, जळगाव क. प., खांडज, सदोबाची वाडी, सांगवी, सस्तेवाडी, सायंबाची वाडी, सोरटेवाडी, झारगडवाडी, वानेवाडी, चोपडज, ढाकाळे, काऱ्हाटी, मळद, पणदरे, पिंपळी, उंडवडी कप, साबळेवाडी, कारखेल, आंबी खुर्द, बऱ्हाणपूर, भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी, चौधरवाडी, ढेकळवाडी, गडदरवाडी, गाडीखेल, जळगाव सुपे या ग्रामपंचायतीमधील एका कर्मचाऱ्यांची चार ठिकाणी नेमणूक केली असल्याचे धवडे यांनी माहिती अधिकारातून उघड केले आहे.
यामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक, अशा स्वयंसेविका, संगणक चालक ऑपरेटर, अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सेविका यांना शासनाच्या विविध विभागातील एकाच वेळी दोन, तीन आणि चार या पदावर एकच व्यक्ती काम करत असताना वेतन आणि मानधनाचा लाभ संबंधित जबाबदार अधिकाऱ्याने दिला आहे.