नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का (फोटो- सोशल मीडिया)
नाशिक/Maharashtra Politics: नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाने हकालपट्टी केलेले नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांची उद्धव ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केली होती.
सुधाकर बडगुजर यांनी भाजपच्या महवाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षात प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांनी ठाकरे गटाला रामराम केला होता. उद्धव ठाकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी सुधाकर बडगुजर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक आमदार सीमा हिरे यांचा विरोध असल्याचे समजते आहे. मात्र स्थानिक नेत्यांचा विरोध झुगारून सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुधाकर बडगुजर यांच्यासोबत बबन घोलप आणि कॉँग्रेस पक्षातील काही नेत्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मी भाजप नेत्यांना धन्यवाद देतो. मी आधीच्या पक्षासाठी खूप काम केले. मात्र पक्षाने माझ्यावर कारवाई केली. ज्या पक्षाने माझा आदर केला नाही, त्यांना या महापालिकेच्या निवडणुकीत दूध का दूध ओर पानी का पानी होणार आहे , हे मी त्यांना सांगू इच्छितो, असे बडगुजर म्हणाले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
चंद्रशेखर बावनकुळे यांना सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत माहिती नसल्याचे दिसून आले आहे. याबाबत सुधाकर बडगुजर यांना माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर ते त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. बडगुजर म्हणाले की, मी मुंबईत गेल्यावर तुम्हाला समजेल. सर्व ठरले आहे त्याशिवाय मी जातोय का? असा उलट प्रश्न सुधाकर बडगुजर यांनी माध्यमांना केला.
वरिष्ठांचा हिरवा तर स्थानिकांचा लाल कंदील; सुधाकर बडगुजरांचा भाजप प्रवेश करणार नाशिकमध्ये उलथापालथ?
भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी देखील सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाला विरोध केला आहे. सुधाकर बडगुजर यांच्यासोबत काम करु शकत नाही. त्या म्हणाल्या की, बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला आमचा विरोध कायम आहे. सोशल मीडियावर देखील आम्ही हे पोस्ट केलं होते. अशा देशद्रोही आणि बंडखोर लोकं,ज्यांनी गोळीबार केला त्यांच्यासोबत काम अवघड आहे. ज्यांच्या विरोधामध्ये मी निवडणूक लढले आणि त्यांच्या विरोधात मी अनेकदा भूमिका स्पष्ट केली आहे. ते माझ्याच मतदारसंघामध्ये आहेत. त्यामुळे अनेकदा समोरासमोर येणार. अशा लोकांबरोबर काम एकत्र कसं करणार? असा सवाल भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी उपस्थित केला आहे.