Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vidhan Parishad Election 2026: पार्थ पवारांची मध्यस्थी यशस्वी, मनधरणीनंतर सुनील टिंगरेंची माघार

विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांकडेही पक्षाचा ‘एबी फॉर्म’ असल्याने राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार नेमका कोण, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी आणि राजकीय चर्चांना उधाण आले होते.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 02, 2026 | 02:21 PM
Pune Politics, NCP Ajit Pawar, Parth Pawar, Sunil Tingre,

Pune Politics, NCP Ajit Pawar, Parth Pawar, Sunil Tingre,

Follow Us
Follow Us:
  • विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य
  • जिजाई बंगल्यावर पार्थ पवार, विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक
  •  पार्थ पवार यांच्या मध्यस्थीनंतर टिंगरे यांची समजूत काढण्यात यश
Vidhan Parishad Election 2026: पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या नाराजीवर अखेर पडदा पडल्याचे दिसत आहे. पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांची नाराजी दूर करण्यात पार्थ पवार यांना यश आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर सुनील टिंगरे यांनी अर्ज मागे घेणार असल्याचे जाहीर केलं आहे.

उमेदवारी अर्ज माघारी घेण्यापूर्वी पुण्यातील जिजाई बंगल्यावर पार्थ पवार, विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पार्थ पवार यांनी टिंगरे यांना भविष्यात योग्य न्याय आणि सन्मान दिला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सुनील टिंगरे म्हणाले, “पक्षाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. पक्ष मला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. राजकारणात काही वेळा पक्षहितासाठी निर्णय घ्यावे लागतात. मी अजितदादांचा कार्यकर्ता असून पक्षाचा शब्द पाळणार आहे. भविष्यात माझा योग्य सन्मान राखला जाईल, असे पक्ष नेतृत्वाने आश्वासन दिले आहे.”

Nashik MLC Election : नाशिकमध्ये महायुतीचा तिढा वाढला! उमेदवारीवरून शिंदे गट-अजित पवार गटात नाराजी, अपक्ष उमेदवारीने

दरम्यान, विक्रम काकडे यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीनाट्य रंगले होते. विक्रम काकडे हे उद्योजक आणि माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र असून माजी आमदार अनिल भोसले यांचे जावई आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे पक्षातील काही इच्छुक नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. पण आता राष्ट्रवादीतील या पेचावर तोडगा निघाला आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने विक्रम काकडे यांना अधिकृत उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पक्षातील काही नेत्यांनी ‘आयात उमेदवार’ असल्याचा मुद्दा उपस्थित करत काकडे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला. या पार्श्वभूमीवर पक्षाने सुनील टिंगरे यांनाही अर्ज दाखल करण्यास सांगितले होते.

8th Pay Commission: कर्मचारी आणि पेन्शनर्सना दिलासा! मेमोरेंडमची शेवटची तारीख बदलली, कधीपर्यंत करता

विशेष म्हणजे, विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांकडेही पक्षाचा ‘एबी फॉर्म’ असल्याने राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार नेमका कोण, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी आणि राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र, पार्थ पवार यांच्या मध्यस्थीनंतर टिंगरे यांची समजूत काढण्यात यश आले. अखेर त्यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील उमेदवारीचा वाद संपुष्टात आला असून विक्रम काकडे हे पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहेत.

आज अर्जांची छाननी, उद्यापर्यंत माघार

निवडणूक प्रक्रियेअंतर्गत उमेदवारी अर्जांची छाननी आज (२ जून) होणार आहे. त्यानंतर ४ जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची संधी उपलब्ध असेल. माघारीनंतर पुणे विधान परिषद निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. महायुतीतील अंतर्गत मतभेद निवळल्याचे संकेत मिळत असले, तरी बंडखोर उमेदवारांच्या भूमिकेमुळे पुढील काही दिवस पुण्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Sunil tingre withdraws from legislative council after parth pawars mediation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • NCP Politics
  • parth pawar
  • Pune Politics

संबंधित बातम्या

Satara Voter List Row: सातारा जिल्ह्यात ५६ हजार दुबार मतदार! काँग्रेसचा प्रशासनावर गंभीर आरोप, पुरावे सादर
1

Satara Voter List Row: सातारा जिल्ह्यात ५६ हजार दुबार मतदार! काँग्रेसचा प्रशासनावर गंभीर आरोप, पुरावे सादर

NCP Merger News: पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर दिल्लीत मोठ्या घडामोडी; पवारांच्या भेटीगाठींमुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे संकेत
2

NCP Merger News: पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर दिल्लीत मोठ्या घडामोडी; पवारांच्या भेटीगाठींमुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे संकेत

Rohit Pawar News: TET घोटाळ्यातील आरोपी आणि भाजप नेत्याचे आर्थिक कनेक्शन ! रोहित पवारांचा गंभीर आरोप
3

Rohit Pawar News: TET घोटाळ्यातील आरोपी आणि भाजप नेत्याचे आर्थिक कनेक्शन ! रोहित पवारांचा गंभीर आरोप

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री केंद्रात जाणार का? विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी एका उत्तरात राजकारण संपवल
4

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री केंद्रात जाणार का? विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी एका उत्तरात राजकारण संपवल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.