Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP Merger News: पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर दिल्लीत मोठ्या घडामोडी; पवारांच्या भेटीगाठींमुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे संकेत

अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीदेखील केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतल्याची माहिती आहे. मात्र, या भेटीबाबत बोलण्यास तटकरे यांनी नकार दिल्याने या भेटीची माहिती समजू शकली नाही.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 28, 2026 | 10:06 AM
NCP Merger, Sharad Pawar, Praful Patel, Parth Pawar,

NCP Merger, Sharad Pawar, Praful Patel, Parth Pawar,

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाची चर्चांना उधाण
  • शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
  • सुनील तटकरे यांनीदेखील केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट
NCP Merger News Update: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाची चर्चांना उधाण आले आहे. मागील काही महिन्यांपासून या चर्चांना विराम मिळाल्याचे बोलले जात होते. पण दिल्लीत अचानक घडलेल्या काही राजकीय भेटींगाठींमुळे या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. (Maharashtra Politics)

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाचे खासदार पार्थ पवार आणि प्रफुल पटेल यांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

 

देशातील काही राज्यात मुसळधार तर काही राज्यात तुरळक पाऊस; उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड, सिद्धार्थनगरमध्ये हवामा

गेल्या आठवड्यात बुधवारी (२२ जुलै) शरद पवार यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चाही झाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पार्थ पवार आणि प्रफुल पटेल यांनीदेखील शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती आहे. या राजकीय भेटीगाठींनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीबाबत प्रफुल पटेल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दुजोरा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी होण्याच्या शक्यताही वर्तवल्या जात आहेत. मात्र शरद पवार गटाने आधी अजित पवार गटात विलीन व्हावे, त्यानंतरच एनडीएमध्ये प्रवेशाचा विचार होऊ शकतो, अशी अट भाजप नेतृत्वाकडून घालण्यात आल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सुनेत्रा पवार यांचा संभाव्य विलिनीकरणाला विरोध असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार आणि प्रफुल पटेल यांनी घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.

Maharashtra Rain Alert: राज्यावर भीषण संकट; काही ठिकाणी अतिवृष्टी तर घाटमाथ्यावर

दुसरीकडे, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीदेखील केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतल्याची माहिती आहे. मात्र, या भेटीबाबत बोलण्यास तटकरे यांनी नकार दिल्याने या भेटीची माहिती समजू शकली नाही.. गेल्या काही दिवसांतील या राजकीय घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना अधिक वेग आला आहे.

रेवती सुळे यांच्या स्वागत समारंभाला प्रमुख नेत्यांची उपस्थिती अपेक्षित

दरम्यान, रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाहानंतर ८ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या स्वागत समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह विविध पक्षांतील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या ६, जनपथ येथील निवासस्थानी हा समारंभ होणार असून, या निमित्ताने पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. तसेच विविध पक्षांतील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.

 

Web Title: Ncp merger news parth pawar praful patel meet sharad pawar in delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Politics
  • parth pawar
  • praful patel
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल
1

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार
2

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
3

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

Devendra Fadnavis : शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेनंतर दुष्काळी परिस्थितीचे पंचनामे करणार!
4

Devendra Fadnavis : शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेनंतर दुष्काळी परिस्थितीचे पंचनामे करणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.