कणकवली : आज कणकवलीत पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये यावेळी युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके , तेजस राणे आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी नलावडे आणि हर्णे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. यावेळी ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत कणकवली शहरात जे मताधिक्य मिळाले, ते पैसे वाटल्याने मिळाली आहेत. कणकवली शहरात नलावडे आणि हर्णे यांना मतांसाठी पैसे देण्याची नामुष्की आली आहे. ज्यांनी विकासकामे केल्याचे सांगत आहेत, तर त्यांना पैसे वाटण्याची गरज काय? जिल्ह्यात माजी खा. विनायक राऊत आणि आ. वैभव नाईक यांनी गेल्या 15 वर्षात या प्रवृत्ती विरुध्द संघर्ष केला आहे. आता जनता निष्ठेचे पाईक असलेल्या वैभव नाईक यांना पुन्हा निवडून देतील आणि वैभव नाईकचं पालकमंत्री होतील. त्यामुळे सत्ता तिथे निष्ठा असलेल्या नलावडे आणि हर्णे यांनी निष्ठेची भाषा करु नये असा उपरोधक टोला युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांनी लगावला.
[read_also content=”जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी केडीएमटी कर्मचाऱ्यांचे लाक्षणिक उपोषण, कामगार आक्रमक https://www.navarashtra.com/maharashtra/symbolic-hunger-strike-of-kdmt-employees-to-implement-old-pension-scheme-547504.html”]
पुढे ते म्हणाले की, येत्या चार महिन्यात निष्ठा कोणाच्यात असते ही समजेल. वैभव नाईक आणि विनायक राऊत गेली 15 वर्षे संघर्ष करीत आहेत. वैभव नाईक हे विजयी होतील, राणेंच्या कार्यकर्त्यांची पैसे वाटणारे असल्याची ओळख झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांनी आमच्या समोर निवडणूक लढवून दाखवावी त्यावेळी कोण जिंकते ते पाहू. लोकसभा निवडणूकीत कोट्यावधी रुपये वाटून विजय मिळवला आहे. तरीपण 4 लाख मते विनायक राऊत यांना मिळाली आहेत हे विरोधकांनी विसरु नये असा इशारा सुशांत नाईक यांनी दिला.
या पत्रकार परिषदेमध्ये कन्हैया पारकर म्हणाले की, राणेंचा ज्यावेळी रविंद्र फाटक यांचा पराभव झाला त्यावेळी किती लोकांवर हल्ले झाले, काहींची बोट तुटली, मात्र विनायक राऊत उद्यापासून जिल्ह्यात जनतेचे आभार मानण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे विरोधकांनी फुकटचे सल्ले देऊन जनतेची दिशाभुल करु नये. महाविकास आघाडी सत्ता आल्यानंतर वैभव नाईक हेच पालकमंत्री असतील. येत्या काळात आम्ही दाखवून देवू, वैभव नाईक हेच मंत्री म्हणून जिल्ह्यात येतील. ज्यावेळी सामंत पालकमंत्री असताना कोण कुठे भेटले होते, त्याची निष्ठा जनतेला समजली आहे असा टोला सुशांत नाईक, कन्हैया पारकर यांनी लगावला.
खऱ्या अर्थाने समीर नलावडे आणि बंडू हर्णे हेच सत्तेच्या जीवावर एन्जॉय करीत आहेत. दोघांनीही वैभव नाईकांना वापरलेला शब्द चुकीचा आहे. भविष्यात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. त्यामुळे वैभव नाईक हे जिंकुन येतील. कणकवली शहरात जे मतदान आम्हाला कमी झाले त्या उणीवा शोधून काढल्या जातील. त्यावर काम करुन पुन्हा नव्या जोमाने पक्ष मजबूत करणार असल्याचे सुशांत नाईक, कन्हैया पारकर यांनी सांगितले.