सुशील केडिया यांनी मागितली माफी (फोटो- ट्विटर)
मुंबई: मुंबईतील उद्योजक सुशील केडिया यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना सोशल मीडियाद्वारे मराठी भाषेच्या मुद्द्यावर आव्हान दिले होते. त्यांनी मनसे प्रमुखांच्या गैरवर्तनाच्या निषेधार्थ मराठी शिकणार नाही असे म्हटले होते. त्यानंतर आता संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी उद्योजक सुशील कोडिया यांच्या मुंबईमधील ऑफिसची तोडफोड केली आहे. त्यानंतर मात्र उद्योजक सुशील केडिया यांनी माफी मागितली आहे.
मी मुंबईत गेले 25 ते 30 वर्षे राहत आहे, मला मराठी येत नाही. जे करायचे ते करा असे विधान उद्योजक केडिया यांनी केले होते. त्यांनी राज ठाकरें यांना आव्हान दिलए होते. त्यानंतर मनसेने खळखट्याक आंदोलन करून त्यांचे ऑफिस फोडले. मात्र या सर्व प्रकारानंतर उद्योजक सुशील केडिया यांनी माफी मागितली आहे.
I request @RajThackeray Ji to consider my humble submission. pic.twitter.com/i8zGszgNtW
— Sushil Kedia (@sushilkedia) July 5, 2025
काय म्हणाले सुशील केडिया
उद्योजक सुशील केडिया यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. मी काल बोललो ते माझी चूक झाली. मी सुधारण्याचा प्रयत्न करेन. मी जे काही बोललो ते मानसिक तणावातून बोललो. माझ्या त्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून वाद निर्माण केला गेला. जे मराठी बोलू शकत नाही त्यांच्यावर हल्ला होत असल्याने मी घाईगडबडीत दिलेली प्रतिक्रिया होती. मी माझी चूक मान्य करतो आणि माफी मागतो.
उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं
मुंबईतील उद्योजक सुशील केडिया यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना सोशल मीडियाद्वारे मराठी भाषेच्या मुद्द्यावर आव्हान दिले होते. त्यांनी मनसे प्रमुखांच्या गैरवर्तनाच्या निषेधार्थ मराठी शिकणार नाही असे म्हटले होते. त्यानंतर आता संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी उद्योजक सुशील कोडिया यांच्या मुंबईमधील ऑफिसची तोडफोड केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी शनिवारी गुंतवणूकदार सुशील केडिया यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. तोडफोडीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. गुंतवणूकदार सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना एका पोस्टमध्ये टॅग करून लिहिले की, मी मराठी शिकणार नाही. या पोस्टनंतर त्यांना धमक्या येत होत्या. केडिया यांनी ‘एक्स‘ वर लिहिले होते की, “मुंबईत ३० वर्षे राहूनही मला मराठी नीट येत नाही आणि तुमच्या घोर गैरवर्तनामुळे मी असा निर्धार केला आहे की जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी माणसाची काळजी घेत असल्याचे भासवत राहतील तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. तुम्हाला काय करायचंय बोला असं म्हटले होते.