मुंबई : महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणणारे पोलीस अधिकारी म्हणून परमबीरसिंह यांना ओळखले जाते. हे तेच पोलीस अधिकारी आहेत, ज्यांनी मविआच्या गृहमंत्र्यांवर 100 कोटींचा वसुली प्रकरणी गंभीर आरोप केला होता. यावर राज्याच्या गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर त्यांना तुरुंवाससुद्धा भोगावा लागला होता.
Maharashtra government drops all charges against former Mumbai police commissioner Param Bir Singh. The state government also quashed the suspension orders issued in December 2021 and said that he was on duty during the period of suspension. pic.twitter.com/7ER4Vj21ZQ
— ANI (@ANI) May 12, 2023
परमबीर सिंग प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी आता सीबीआयचे लक्ष्य ठरले आहेत. 100 कोटी वसुली प्रकरणाचा तपास करणाऱ्या सर्व तपास अधिकाऱ्यांना सीबीआय समन्स पाठवणार आहे. हे सगळे राज्य सरकारने नियुक्त केलेले तपास अधिकारी असून सीआयडी, गुन्हे शाखा किंवा ठाणे पोलिसांत ते सध्या कार्यरत आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मुंबईचे पोलीस आयुक्त असताना आपल्याला अवैधरीत्या मुंबई मधील बार मालकाकडून 100 कोटी रुपये जमा करण्यात सांगितले. अशा प्रकारचे खळबळजनक पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. तसेच आपण केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी, यासाठी परमबीर सिंग यांनी सर्वात आधी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिल्यानंतर, परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका केली होती.
चौकट
अरविंद सावंत प्रतिक्रिया – या लोकांना अशीच भ्रष्ट माणसे लागतात. त्यांची ही कृती अत्यंत सौदेबाजी आणि निर्लज्जपणाचा हा कळस आहे. यांना विरोधी पक्षांना त्रास देणारी भ्रष्ट माणसे जवळ लागतात.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरील गुन्हे
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात ठाणे नगर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असून त्याचा तपास पोलिस करत आहेत. ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या वसुलीच्या गुन्ह्याचा आणि बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याचा तपास सीआयडी करत आहे. तसेच मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या वसुलीच्या गुन्ह्याची सीआयडीकडून चौकशी सुरु आहे.
मुंबईतील गोरेगाव पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या वसुलीच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट 11 करत होते. याशिवाय परमबीर सिंग यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची एसीबी खुली चौकशी करत होती. हे सर्व गुन्हे आता सीबीआयकडे वर्ग झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांच्यावर दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले होते. आठवडाभराच्या कालावधीत परमबीर सिंह यांच्यावर दाखल असणाऱ्या सर्व गुन्ह्यांची कागदपत्रे महाराष्ट्र पोलिसांनी सीबीआयला सोपवावीत असे निर्देशही न्यायालयाने दिले होते.