अकोला : अकोला शहराचे तापमान (Temperature in Akola) सर्वाधिक वाढताना दिसत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून तर उन्हाळा संपेपर्यंत उन्हाळ्याच्या तापमानाचे अनेक रेकॉर्ड तयार होतात. त्यामध्ये अकोल्याचे तापमान कधी विदर्भात सर्वाधिक तर कधी देशात सर्वाधिक राहते. यावर्षीच्या उन्हाळ्यात आतापर्यंत 44.4 डिग्री सेल्सिअस हे सर्वाधिक तापमान होते. मात्र, बुधवारी (दि. 22) अकोल्याचे तापमान 44.8 डिग्री सेल्सिअस नोंदविले गेले असून, हे यावर्षीच्या उन्हाळ्यातील अकोल्याचे सर्वाधिक तापमान आहे.
अकोल्यामध्ये यापूर्वी 5 मे रोजी 44.4 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यापूर्वी 4 मे रोजी 44.3 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. 20 एप्रिल रोजी 43 डिग्री सेल्सिअस, 19 एप्रिल रोजी 44 डिग्री सेल्सियस, 18 एप्रिल रोजी 43.3 डिग्री सेल्सिअस तर 27 मार्च रोजी 42 डिग्री सेल्सिअस हे या वर्षीच्या उन्हाळ्यातील जास्त तापमानाचे आठवड्याभरातही 42 डिग्रीच्या जवळपास तापमान राहिलेले आहे. परंतु, बुधवारी (दि. 22) 44.8 डिग्री तापमानाची नोंद झाल्याने अकोल्यासाठी यावर्षीच्या सेल्सिअस बुधवार उन्हाळ्यातील सर्वात हॉट दिवस ठरला आहे.
गेल्या आठवड्याभरापासून सतत तापमानात वाढ होत असल्याने अकोला जिल्ह्यामध्ये वैशाख वणवा पेटल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. अजून काही दिवस तापमानाचा कहर कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना या भयंकर उन्हाचा त्रास काही दिवस सहन करावा लागणार आहे.