मुंबई: महानगरपालिका क्षेत्रातील (BMC) हरित क्षेत्रात (Green Area) वाढ होण्यासह पर्यावरणाचे संवर्धन व्हावे (Environment Conservation); यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने सर्व स्तरीय प्रयत्न करत असते. याचीच पोच पावती म्हणून मुंबईला ” ग्रीन सिटी ऑफ द वर्ल्ड ” (Green City of the World) म्हणून युनायटेड नेशन्स फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशन सन्मानित करण्यात आले आहे.
यातून प्रेरणा घेत महापालिकेने १० हजार चौरस मीटर पेक्षा अधिक आकाराच्या भूखंडावर इमारतीचे बांधकाम करताना भूखंडाच्या खुल्या क्षेत्रावरील काही भागात ‘मियावाकी वन विकसित करणे बंधनकारक (Miyawaki Forest Mandatory) केले आहे. त्यामुळे अत्यंत कमी जागेत अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याच्या या पद्धतीमुळे महापालिका क्षेत्रातील पर्यावरण संवर्धनास निश्चितच गती मिळेल, असा विश्वास उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी व्यक्त केला.
ग्रीन सिटी ऑ द वर्ल्डसाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरात एक वर्षात किती झाडे लावली याबाबत माहिती घेण्यात आली. त्याच प्रमाणे०३ वर्षात लावलेल्या झाडांच्या सदय स्थितीची पहाणी, नागरिकांचा सहभाग, पालिका अधिकारी, संस्था यांचा देखील सहभाग तपासण्यात आला. त्याचसोबत बायोडायव्हरसिटी, चिमणी पक्षांची संख्या, ट्री बोर्ड आणि बजेट देखील यात तपासण्यात आले. यात मुंबईची मियावाकी जंगले आणि वृक्षारोपण झालेल्या ३ लाखांहून अधिक झाडे आकर्षण केंद्र ठरले आणि मुंबईला ” ग्रीन सिटी ऑ द वर्ल्ड ” म्हणून सन्मानित करण्यात आले.
[read_also content=”Raigad पोलीस भरतीला डोपिंगचे ग्रहण, तीन व्यक्तींकडे सापडले औषधी द्रव्य; गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करणार- पोलीस अधीक्षक https://www.navarashtra.com/crime/raigad-police-arrested-for-doping-drugs-found-in-bharti-of-three-persons-strict-legal-action-will-be-taken-against-miscreants-superintendent-of-police-nrvb-360541.html”]
यातून प्रेरणा घेत महापालिकेने आणखी काही पाऊले पुढे टाकत महानगरपालिका क्षेत्रातील १० हजार चौरस मीटर आकाराच्या भूखंडावर इमारत बांधकाम करताना विकास नियंत्रण नियमावलीच्या संबंधित नियमांनुसार निर्धारित आकाराची जागा ही ‘खुले क्षेत्र’ असणे बंधनकारक आहे.
यानुसार खुल्या क्षेत्रासाठी जेवढी जागा निर्धारित करण्यात येईल, त्या जागेच्या ५ टक्के इतक्या आकाराचे ‘मियावाकी वन’ विकसित करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. हे ‘मियावकी वन’ विकसित करण्यासाठी संबंधित विकासकाला काही तांत्रिक मार्गदर्शन लागल्यास त्याची माहिती उद्यान खात्याद्वारे देण्यात येणार आहे असे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.
[read_also content=”Shocking! दिल्लीची मान पुन्हा शरमेने खाली झुकली; पतीने गर्भवती महिलेला जाळले, DCW ने पाठवली पोलिसांना नोटीस https://www.navarashtra.com/crime/crime-shocking-once-again-delhi-was-put-to-shame-husband-in-laws-burn-pregnant-woman-by-petrol-dcw-sent-notice-to-police-nrvb-360533.html”]
सामान्य वनांच्या तुलनेत मियावाकी पद्धतीने विकसित करण्यात येणा-या वनांमधील झाडे ही अधिक वेगाने वाढतात. एरवी सामान्य पद्धतीने लावलेले झाड वाढण्यास जेवढा कालावधी लागतो, त्यातुलनेत साधारणपणे निम्म्यापेक्षा कमी कालावधीत तेवढ्याच उंचीचे झाड वाढते. तसेच साधारणपणे २ वर्षात विकसित होणा-या मियावाकी पद्धतीच्या वनांमध्ये झाडांमधील अंतर हे कमी असल्याने ती घनदाट असतात.