आजच्या आधुनिक EVमध्ये बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम BMS असते. ही प्रणाली कारच्या सुरक्षिततेसाठी आणि संतुलित पद्धतीने कार्य करण्यासाठी मदत करते. पण प्रत्येकवेळी बॅटरी 100 टक्के चार्ज केल्याने तिच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. पण 80 टक्क्यांपर्यंत चार्ज केल्याने बॅटरीवर कमी ताण येतो. याउलट जास्त चार्ज लेव्हलमुळे बॅटरीमधील ताण वाढतो, ज्यामुळे ती पूर्णपणे चार्ज होण्यास जास्त वेळ लागतो. म्हणूनच ती 80 टक्के ते 100 टक्के पर्यंत चार्ज होण्यास बराच वेळ लागतो. 100 टक्के पर्यंत वारंवार चार्ज केल्याने बॅटरी लवकर कमकुवत होऊ शकते. EV बॅटरी बऱ्याच महाग असतात. जर बॅटरी बिघडली तर ती बदलणं बरंच महाग आणि खर्चीक ठरु शकतं. बॅटरी जर बॅटरी बिघडली तर ती बदलणे महाग असू शकते.बॅटरी 80 टक्के चार्ज ठेवल्याने बॅटरी दीर्घकाळ टिकते आणि त्यामुळे तिचं आयुष्य वाढतं त्यामुळे भविष्यातील खर्च कमी होतो. पण जर तुम्ही लांब पल्ल्याचा प्रवास करणार असाल तर 100 टक्के चार्जिंग करणं सोयीचं ठरतं. पण दैनंदिन दिवसांना 80 टक्के नियमांचं पालन करणंच सोयचं आहे.
पेट्रोल आणि डिझेल वाहनांप्रमाणे EV काही मिनिटांत चार्ज होउ शकत नाही. बॅटरी 80 टक्के पर्यंत लवकर चार्ज होतात. परंतू त्यानंतर चार्जिंग स्लो होते. म्हणून 80 टक्के चार्जिंग झाल्यानंतर वापरासाठी सोयीची ठरत असल्याने वेळ वाचतो. शिवाय, चार्जिंग स्टेशनवर गर्दी कमी असते,ज्यामुळे इतरांना त्यांची वाहने अधिक लवकर चार्ज करता येतात.
बहुतेक इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम असते. जेव्हा तुम्ही ब्रेक लावता किंवा वेग कमी करता तेव्हा ही सिस्टम बॅटरीमध्ये ऊर्जा परत साठवते. जर बॅटरी आधीच 100टक्के भरलेली असेल, तर ही अतिरिक्त ऊर्जा साठवता येत नाही. तथापि, जर बॅटरी 80 टक्के पर्यंत चार्ज केली गेली तर जागा शिल्लक राहते आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंगचा पूर्ण फायदा मिळतो.






