ठाणे/स्नेहा जाधव,काकडे : रस्त्यावरील श्वानांचा कायम त्रास होतो असं कायमच रडारड सुरु असते. याचपार्श्वभूमीवर रस्त्यावरील श्वानांसाठी आज ठाण्यात प्राणी प्रेमींचा आवाज बुलंद करण्यात आला. ‘सिटिझन फॉर अॅनिमल प्रोटेक्शन (CAP) फाउंडेशन’ आणि ‘डॉग मंत्रा’ या संस्थांच्यावतीने शनिवारी उपवन तलाव, ठाणे (प.) येथील ॲम्फीथिएटर येथे शांततापूर्ण जमाव आयोजित करण्यात आला होता. या शांतता आंदोलनातून ठाणेकरांनी करुणा, मानवता आणि न्यायाची हाक दिली. प्राणी कल्याणाकडे भारताची वाटचाल ही जबाबदारी व काळजीने परिपूर्ण असावी, हा संदेश या आंदोलनातून देण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात दिल्लीच्या धर्तीवर मुंबईमध्ये प्राणीप्रेमींनी करुणेचा आवाज बुलंद केला होता. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण दिशा-निर्देश देऊन रस्त्यावरील श्वानांच्या बाबतीत तात्पुरता दिलासा दिला असला तरी त्यावर अजून ठोस निर्णय बाकी आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये शेकडो श्वानांना पकडून, न बांधलेल्या शेल्टरमध्ये कैद करण्याच्या आदेशाविरोधात ही कृती होती. या विरोधात हजारो प्राणीप्रेमी दिल्लीत रस्त्यावर उतरले होते. या प्राणीप्रेमींच्या समर्थनार्थ आज ठाण्यात शांततापूर्ण जमाव करून एक रॅली देखील काढण्यात आली.
कॅप फाउंडेशनचे सुशांक तोमर आणि डॉग मंत्राचे आकाश शुक्ला म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाकडून हा तात्पुरता दिलासा असला तरी खरी उपाययोजना लसीकरण, नसबंदी आणि जनजागृती ही आहे, महापालिका व स्थानिक प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी यासाठी जागृती करणे.
आदेशाच्या अंमलबजावणीत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खालील प्रश्न उपस्थित केले :
▪ खाद्य केंद्रे ठरवली जात नाहीत तोपर्यंत प्राणीप्रेमींनी काय करावे?
▪ ‘आक्रमक’ श्वान ठरवण्याचा अधिकार नेमका कोणाकडे? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.