शरद पवार गटाची LIC कार्यालयावर वर धडक
अदानी समूहाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) गैरवापर केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांनी केला आहे. एलआयसीवर दबाव आणून अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये तब्बल 33 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्य तरुण उद्योजकांना साधे लाखभर रुपयांचे कर्जही मिळत नाही, या विरोधात राष्ट्रवादी (शरद पवार गट) तर्फे ठाण्यातील एलआयसी कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात आले.
जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. कार्यकर्त्यांनी “मोदी-अदानी भाई भाई”, “या सरकारचे करायचे काय वरती डोके, खाली पाय” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
कर्जत तालुक्यातील शेतकरी आक्रमक! अतिवृष्टीमुळे भाताचे ९०% पीक खराब, एकरी ५० हजाराच्या मदतीची मागणी
आंदोलनकर्त्यांनी विभागीय व्यवस्थापक रूपा भंडारे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यांनी म्हटले की, “जर अदानीसारख्या मोठ्या उद्योगसमूहाला 33 हजार कोटी रुपये देता येतात, तर आम्हा बेरोजगार तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवली कर्ज का दिले जात नाही?” एलआयसीने तरुण उद्योजकांना सुलभ कर्ज योजना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
Ghatkopar Fire: 200 पेक्षा जास्त नागरिकांना आगीने घेरले; घाटकोपरच्या १३ मजली इमारतीमध्ये भीषण तांडव
मनोज प्रधान म्हणाले, “वाॅशिंग्टन पोस्टच्या अहवालानुसार एलआयसीने अदानी समूहात 33 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून एकूण गुंतवणूक 60 हजार कोटींवर पोहोचली आहे. हिंडेनबर्ग अहवाल आल्यानंतर अनेक बँका अदानी समूहाकडून कर्जवसुली करत असताना, अशा परिस्थितीत एलआयसीने गुंतवणूक करणे ही गंभीर बाब आहे. एलआयसीमध्ये 30 कोटी जनतेचा पैसा आहे. तो सरकारच्या सांगण्यावरून कोणत्याही खासगी समूहाला देऊ नये. जर हा समूह बुडाला, तर जनतेच्या पैशावर गदा येईल. सरकारने एलआयसीवर टाकलेला दबाव तत्काळ थांबवावा आणि एलआयसीने स्वतंत्र निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य राखावे.”






