ठाणे – दिवसरात्र सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस भगिनी आणि पोलीस बंधूंच्या वतीने कळवा पोलीस ठाण्यात हळदीकुंकू या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे कर्तव्यावर कायम असलेल्या पोलीस कर्मचारी आणि महिलांना सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद प्रत्यक्षात अनुभवता आला. या हळदीकुंकूच्या कार्यक्रमास कळवा पोलिस ठाण्यातील सर्व कर्मचारी आणि महिला पोलिसांची कुटुंबीय उपस्थिती होते.
[read_also content=”सायको पबजी गेमर! १००हून अधिक तरुणींचे चलाखीने केले न्यूड काढले आणि…. ब्लॅकमेल करण्याची पद्धत पाहून पोलिसही शॉक झाले https://www.navarashtra.com/latest-news/psycho-pubji-gamer-arrested-nude-videos-of-more-than-100-youngsters-some-videos-were-also-blackmailed-on-social-media-nrvk-230133.html”]
मराठी संस्कृतीत मकरसंक्रांत नंतर येणाऱ्या हळदीकुंकू कार्यक्रमाला खूप महत्त्व आहे. विवाहीत महिलांसाठी हा सण म्हणजे एक पर्वणी असते. मोठ्या संख्येने विवाहित महिला हा सण उत्साहात साजरा करतात. अशाच प्रकारे कळवा पोलिसांनी महिला कर्मचारी आणि हद्दीतील महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. या कार्यक्रमात हळदीकुंकूवाचे वाण म्हणून महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले तसेच शक्ती कायद्याचे महत्व पटवून देण्यात आले. यावेळी हळदी कुंकू, पैठणी वाटप, पोलीस अधिकारी यांचे सुंदर गायन, महिलांना आणि तरुणींना स्वरंक्षणचे धडे आणि विलक्षण आनंदाचा क्षण हळदीकुंकूच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पोलीस कर्मचाऱ्यांना अनुभवता आला.
[read_also content=”आजपासून पुन्हा स्कूल चले हम, महाराष्ट्रात शाळा सुरु – पालकांच्या मनातील संभ्रमामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी https://www.navarashtra.com/dhule/khandesh/dhule/schools-reopening-in-dhule-after-restriction-changed-nrsr-230127.html”]