वाई : बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया पुणे शाखेच्या वतीने राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट बांधकाम स्पर्धेमध्ये टी अँड टी इन्फ्रा लिमिटेड कंपनीने वाई येथे बांधलेला कृष्णा पुलाला उत्कृष्ट बांधकाम विभागात राज्यभरातून पहिला पुरस्कार मिळाला आहे .
शहराच्या किसनवीर चौक ते सोनगीर वाडी या दोन भागांना जोडणारा कृष्णा नदीवरील ब्रिटिश कालीन जुन्या पुलाची मुदत संपल्याने त्याजागी आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नाने पालिकेने नव्याने पूल बांधण्यात आला आहे. पुणेस्थित ‘टी अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीने जुना पूल पाडून अत्याधुनिक तंत्रज्ञान व यंत्रणाचा वापर करून एक वर्षात पूल उभारला. मागील दोन वर्षात राज्यभरात नव्याने उभारण्यात आलेले पूल इमारती यांचे मानांकन महाराष्ट्र राज्य बिल्डर्स असोसिएशनच्या पुणे शाखेच्या वतीने दरवर्षी करण्यात येते. राज्यभरातून अनेक नामांकने पुरस्कारासाठी नोंदविले जातात मानांकन मिळविण्यासाठी टी अँड टी इन्फ्रा लिमिटेड कंपनीने सहभाग नोंदवला होता. पुलाच्या बांधकामाचे,तांत्रिक विश्लेषणाचे सादरीकरण केले होते.पूर्वीच्या ब्रिटिशकालीन पुलासारखाच दिसणारा हा नवीन पूल उभारण्यात आला असून त्याला जुन्या पुलासारखेच दगडी संरक्षक रेलिंग करण्यात आले आहे. शहरातील कृष्णा नदीवरील घाट व ऐतिहासिक पार्श्वभूमीला अनुसरून पूर्वीच्या ब्रिटिश कालीन पुलाला साजेशी पुलाची रचना करण्यात आली आहे.यामुळे पुलामुळे शहराच्या सौंदर्यात भरच पडली आहे. बिल्डर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र शाखा पुणे च्या सदस्यांनी नव्याने उभारण्यात आलेल्या येथील कृष्णा पुलाचे परीक्षण केले होते. हा पूल बांधताना आधुनिक पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.पुलाच्या तांत्रिक बाबी व सौंदर्य तपासण्यात आले होते.राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट बांधकाम स्पर्धेमध्ये कृष्णा पुलाला उत्कृष्ट बांधकाम( इन्फ्रास्ट्रक्चर) विभागात राज्यभरातून पहिला पुरस्कार मिळाला आहे
या समितीत यामध्ये इंजिनियर आर्किटेक्चर स्ट्रक्चरल ऑडिटर,स्टील डिझायनर आणि बांधकामाचे तांत्रिक विश्लेषण करणारे सदस्य या शिस्टमंडळात होते.बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया पुणे यांनी आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात या पुलाला राज्यभरात पहिले नामांकन देण्यात आले. हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे अजित गुलाबचंद बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया राज्य अध्यक्ष सचिन देशमुख उपाध्यक्ष पश्चिम विभाग सुनील मुंदडा यांच्या हस्ते टी अँड टी इन्फ्रा तर्फे कार्यकारी संचालक शिवराम थोरवे उपकार्यकारी संचालक अभिषेक थोरवे व्यवस्थापकीय संचालक नवनाथ ( संभाजी ) येवले, बाळासाहेब मोरे राजेश सोहनी बिपिन आरे बांधकाम व्यवस्थापक विशाल कांबळे ,प्रोजेक्ट समनव्यक स्नेहल देशपांडे ,विरिष्ठ अभियंता अनिरुद्ध टेकाळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी बिल्डर असोसिएशनच्या पुणे विभागाचे अध्यक्ष डी एस चौधरी सचिव अजय गुजर माजी अध्यक्ष एस एस आनंद उपाध्यक्ष सुनील माटे सुनील मैदो राजाराम हजारे व राज्यभरातील स्पर्धक समन्वयक ठेकेदार आदी उपस्थित होते