Photo Credit- Team Navrashtra रुग्णालय सुविधा, नियम, कायद्यांबाबत चर्चा
सासवड: पुरंदर तालुक्यातील विमानतळ प्रकल्प रद्द करावा यासाठी प्रकल्प बाधित सात गावांतील शेतकऱ्यांनी शुक्रवारी दि. ४ रोजीपासून सासवडमधील प्रशासकीय इमारतीसमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आपले उपोषण मागे घ्यावे यासाठी पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी रात्री उशिरा उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याकडे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र जोपर्यंत प्रकल्प रद्द केल्याची अधिसूचना निघत नाही तोपर्यंत उपोषण सुरु राहिल असा इशारा दिला. यामुळे तहसीलदार विक्रम राजपूत यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, पारगाव, खानवडी आदी सात गावात विमानतळ प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी २८३२ हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. यामुळे सातही गावांतील नागरिक कायमचे विस्थापित होणार आहेत. त्या बरोबरच शेती, कुक्कुटपालन व्यवसाय, जनावरांचे गोठे, शेततळी, विहीर, बोअर, सर्व घरे, जनावरे सर्व सोडून जावे लागणार आहे. पिढ्यानपिढ्या राहत असलेली घरेदारे सोडून दुसऱ्या गावी राहून परवडणारे नाही, याचे दुख शेतकरी वारंवार बोलून दाखवीत आहेत. मात्र शासन शेतकऱ्यांची कोणतीही बाजू ऐकून न घेता दररोज एक-एक अध्यादेश पारित करीत आहे.
Sedan vs SUV: मायलेज, फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत कोणती कार आहे बेस्ट?
सुविधांपासून शेतकऱ्यांना रहावे लागणार ‘वंचित’ गेल्या महिन्यात विमानतळ प्रकल्प क्षेत्रातील गावे औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) म्हणून शासनाने जाहीर केली. तसेच भूसंपादनाचा पुढील टप्पा गाठण्याच्या दृष्टीने गावोगावी अधिकारी शेतकऱ्यांशी संवाद च्या माध्यमातून ड्रोन सर्व्हे करण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच पुढील टप्प्यात ३२ ‘ग’ चा आदेश निघाल्यानंतर सर्व क्षेत्रावर शिक्के मारण्याची प्रक्रिया होणार आहे. जमिनीवर शिक्के मारल्यावर शेतकऱ्यांना कोणत्याही सुविधा मिळणार नाहीत. केवळ जिल्हा बँकेकडून मिळणारे पिक कर्ज वगळता इतर सर्व सुविधांपासून कायमचे वंचित राहावे लागणार आहे.
आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा विमानतळ प्रकल्प नकोच अशी घोषणा करून २०१६ पासून सात गावांतील शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी सासवडमधील प्रशासकीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. तसेच कोणत्याही परिस्थतीत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री तहसीलदार विक्रम राजपूत यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेतली. तसेच त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, मात्र आमच्या भावना जोपर्यंत शासनापर्यंत पोहोचत नाहीत. तसेच शासन आमची दखल घेणार नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असा इशारा दिला. प्रांताधिकारी यांनी भेट घ्यावी, आम्हाला न्याय द्यावा अशी मागणीही केली आहे.
Pune News: “हे रूग्णालय ताब्यात…”; मंगेशकर रूग्णालयातील घटनेवरून आदित्य ठाकरेंचा जोरदार