अक्कलकोट : अक्कलकोट व दुधनी बाजार समितीची निवडणूक जिल्ह्यात गाजली. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दुधनी बाजार समितीमध्ये भाजपची सत्ता आणून अगामी पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालीका निवडणुकपुर्वी मास्टर स्ट्रोक मारला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सोलापुर जिल्ह्यात शत प्रतिशत भाजप वाढीचे धोरण यशस्वीपणे राबविण्यात मोठे यश प्राप्त केले आहे. माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांची मोठी साथ कल्याणशेट्टी यांना लाभली आहे. दुधनी बाजार समितीचा निकाल तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा निकाल ठरणार असून आ. कल्याणशेट्टी यांचा जिल्ह्यात दबदबा वाढला आहे.
भाजपने तालुक्यातील सहकार संस्थावर वर्चस्व पुनश्च: सिध्द केले आहे. अक्कलकोट व दुधनी बाजार समितीच्या निवडणूका यापूर्वी देखील गाजल्या. मात्र यंदाची पंचवार्षिक निवडणूक आरोप-प्रत्यारोपमुळे अंत्यत चुरशीची बनली. कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान व मतमोजणी झाली. या निवडणुकीतील मतदारसंघ निहाय मतदानाची आकडेवारी, उमेदवार याचा विचार करता अक्कलकाेटमध्या सहकारी संस्था मतदारसंघातून एक जागा वगळता सर्वच जागावर भाजपने बाजी मरली, तर दुधनीमध्ये सर्वच जागा भाजपने काबीज केल्या आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघात मात्र दोन्ही बाजार समितीत काँग्रेसने जागा काबीज केल्या आहेत. यासह व्यापारी मधून दुधनी बाजार समितीत दोन जागा बिनविरोध झाल्या.
व्यापारी मतदारसंघात चुरस
अक्कलकोट बाजार समितीच्या व्यापारी मतदारसंघात चुरशीने निवडणूक झाली. या व्यापारी मतदारसंघातून शेतकरी परिवर्तन पॅनेलची पंचायत झाल्याने अपक्ष अन् शेतकरी विकास पॅनेल अशी निवडणूक झाली. या निवडणूकीत अपक्ष उमेदवार यशस्वी होतील, अशी सर्वत्र चर्चा होती. मात्र शेतकरी विकास पॅनेलमधील उमेदवार बसवराज माशाळे व श्रीशैल घिवारे यांना पॅनेल टू पॅनेल मतदान झाल्याने व्यापारी मतदारसंघातून दोन्ही उमेदवार विजयी झाले.
दिग्गजांना धक्का
अक्कलकोट तालुक्याच्या राजकारणात बाजार समिती निवडणुक माध्यमातुन राजकीय बस्तान बसवू पाहणाऱ्याना अनेक दिग्गजाना निवडणुक निकालाने मोठा धक्का बसला आहे.