एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्त्यात तब्बल 'इतक्या' टक्क्यांनी वाढ (फोटो सौजन्य-X)
ST employees News In Marathi : एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे ‘अच्छे दिन’ आले असून रकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 7 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. ४६ टक्के असलेला महागाई भत्ता आता ५३ टक्के करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. तसेच, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी वैद्यकीय योजनेत मोठे बदल करण्यात आले. जेणेकरून कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन आरोग्य गरजांसाठी दिलासा मिळेल.
राज्यातील विविध एसटी कर्मचारी संघटनांच्या मागण्या लक्षात घेऊन सह्याद्री अतिथीगृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महागाई भत्ता वाढवण्याव्यतिरिक्त, वैद्यकीय योजनेत बदल करण्याचा निर्णय चर्चेत आला.
महागाई भत्ता ५० टक्क्यांनी वाढला तर घरभाडे भत्त्यातही अशीच वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे लक्ष्य आहे. सध्या तालुका पातळीवर घरभाडे भत्ता ८ टक्के आहे आणि प्रत्यक्षात ७ टक्के दिला जातो आणि म्हणूनच तो वेळेवर मिळत नाही, ही कर्मचाऱ्यांची तक्रार होती.
राज्यातील सर्व एस. टी. कर्मचारी संघटनांची विविध प्रश्नाबाबतची बैठक आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपू्र्ण निर्णय घेण्यात आले.
* एस.टी. कर्मचाऱ्यांना आता ५३ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येणार आहे.
* एस. टी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा/ प्रतिपूर्ती, वैद्यकीय तपासणी, समुपदेशन यासाठी धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना राबविवणार.
* रु.५ लाखापर्यंत कॅशलेस वैद्यकीय लाभ एस. टी कर्मचाऱ्यांना मिळणार
* महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना स्टेट बँकेमार्फत अपघाती विमा कवच लागू करण्यात येत असून वैयक्तिक अपघातात निधन झाल्यास (पी.ए.एस.) रु.१ कोटी पर्यंत आणि पूर्ण अपंगत्व आल्यास रु. १ कोटी पर्यंत अपघात विमा मिळणार आहे.
* एसटीच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या पत्नीला वर्षभर एसटीतून मोफत प्रवास करण्याचा पास देण्यात येईल.
आज ५३% महागाई भत्ता, अपघातात अपंगत्व आल्यास १ कोटी रूपये, १२ महीण्यांचा फ्री पास या योजना मा उपमुख्यमंत्री व मा परिवहन मंत्र्यांनी जाहीर केल्या त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो. याचबरोबर थकबाकीचा निर्णय तातडीने घ्यावा, तिकीट दरवाढ ५ रूपयांच्या पटीत करावी , आरटीओ दंड रद्द करावेत शिस्त व आवेदन पद्धत सोपी करावी अशी आमची मागणी आहे,अशी प्रतिक्रिया एसटी कामगार कृती संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली.