पुणे: पुण्यातील मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीचा (Procession of Lord Ganesha) वाद मुंबई उच्च न्यायालयात (High Court) पोहोचला आहे. या संदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. लक्ष्मी रोडवरून प्रथम पाच मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूकच सुरू होण्याच्या प्रथेविरोधात आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
[read_also content=”नारायण राणे यांच्या सुनेच्या कारला अपघात; पोलिसांनी ट्रकचालकाला घेतले ताब्यात https://www.navarashtra.com/maharashtra/narayan-ranes-daughter-in-laws-car-accident-the-police-took-the-truck-driver-into-custody-nrdm-322953.html”]
पुण्यात अंनत चतुर्दशीला आधी मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर छोट्या मंडळांच्या गणपतीची मिरवणूक काढण्यात येते. मात्र, मानाच्या गणपतीआधी छोट्या मंडळांना विसर्जन मिरवणुकांची परवानगी द्यावी, अशा आशयाची मागणी करणारी याचिका बढाई समाज ट्रस्टच्या वतीन करण्यात आली होती. या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावली. केवळ एकाच मंडळाची रिट याचिका असल्याने, इतर मंडळेही याचिकाकर्ते नसल्याने आणि ही जनहित याचिका नसल्याने प्रश्न गृहित धरून सरसकट आदेश देता येणार नाही. असा निकाल न्यायालयाने दिला. तसेच, मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला अमुक तासच लागतील वगैरे मुद्देही गृहीत धरता येणार नाहीत, असे न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व न्यायमूर्ती आर. एन. लद्धा यांच्या खंडपीठाने सांगितले.
[read_also content=”अर्शदीपचे आई वडील ट्रोलर्सवर संतापले! दिली ‘ही’ प्रतिक्रिया https://www.navarashtra.com/sports/arshdeep-parents-are-angry-with-the-trollers-given-this-response-322923.html”]