जत शहरात घाणीचे साम्राज्य
जत: जत नगरपरिषदेच्या अनागोंदी कारभारामुळे शहरातील सर्वच प्रभागात अस्वच्छता, जागोजागी कच-याचे ढीग, तुंबलेल्या गटारी, यामुळे मोठ्याप्रमाणात डासांचा उपद्रव, डासांमुळे डेंग्यू, मलेरियाचा फैलाव सुरू असून जत नगरपरिषदेने त्वरीत डासप्रतिबंधक फवारणी करण्याची अवश्यकता आहे.
शहरातील प्रभाग क्र.८ मधिल इदगाह मैदान ते जत हायस्कूल कडे जाणा-या रस्त्यावरील अतिक्रमण श्री.यल्लमादेवी यात्रेपूर्वी थोड्या प्रमाणात काढण्यात आले असलेतरी कोळी घर ते पडळकर घरापर्यंत च्या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडल्याने व या खड्ड्यात गटारीचे पाणी साचून राहील्याने व पाणी रस्त्यावर पसरल्याने मोठी आरोग्य समस्या निर्माण झाली आहे. कोडग काॅम्प्लेक्स समोरील गटारतर पूर्णपणे चाॅकप झाली आहे.व या परीसरात डासांची संख्या वाढली आहे.
जत नगरपरिषद शेजारील ओढापात्रात तर मोठ्याप्रमाणात काटेरी झाडे उगवली असून यामुळे ओढापात्र पूर्णपणे झाकून गेले आहे. यामुळेही मोठ्याप्रमाणात डासांची उत्पत्ती होत असून नगरपरिषदेने त्वरीत ही ओढापात्रातील बल्लारी काढून टाकण्यासाठी आपल्याकडील यंत्रणेमार्फत सुरूवात करावी व स्वच्छ जत, सुंदर जत चा नारा प्रत्यक्षात आणावा ही अपेक्षा जत शहरवासियांकडून होताना दीसत आहे.
जत पोलिसांची मोठी कारवाई
पुण्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, पुण्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता जत पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने २४ तासांत वयोवृद्ध महिलेला लुटणाऱ्या आरोपीस अटक केली आहे. आरोपीने चोरलेला १ लाख ३५ लख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीचे नाव महादेव मारुती ठवरे (वय ४०, घाटगेवाडी रोड, रामपूर ता. जत) असे आहे.