पालघर : पालघर जिल्हा परिषदेतील जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेसाठी आपापल्या मतदारसंघातील प्रश्नांची सूची जिल्हा परिषदेला आगावू देऊन सुद्धा सभेच्या पटलावर एक ही प्रश्न घेतला नसल्याने अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या हम करे सो कायद्याच्या विरोधात नाराजी प्रकट करून अध्यक्षांनी यात लक्ष घालणे अपेक्षित असताना तसे होत नसल्याबद्दल रोष प्रकट केला सदस्यांची जर ही परिस्थिती असेल तर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाचे काय असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला.
इतिवृत्त मंजुरीला टाकण्या अगोदर तालुक्यातील गटविकास अधिकारी सभेला अनुपस्थित राहिल्याने जिल्हा परिषद अध्यक्षांनी त्याचा निषेध नोंदवत त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश देण्यात आले बांधकाम खात्याकडून कामाच्या आराखडे मंजूर करण्यासाठी 50, 54 चे आराखडे न देता तुम्ही प्रस्ताव संमत करायला कसे सांगतात आम्ही काय पाहून आराखडे मंजूर करायचे असा प्रश्न वैदेही वाढांण व इतर सदस्यांनी उपस्थित केल्यावर अध्यक्ष हतबल झाल्याचे दिसत होते त्यांनीही लगेचच ते आराखडे सर्व सदस्यांना देण्यात यावेत असे आदेश देऊन तो प्रश्न पुढे ढकलला त्याच्या अगोदर झालेल्या सर्वसाधारण सभेत गैरहजर शिक्षक त्यांची माहिती मागवली होती ती या सभेत मिळाली नसल्याबद्दल सुरेखा थेतले यांनी जिल्हा परिषदेच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली.
आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना तीन ते चार महिने पगार मिळाला नाही त्याबद्दल त्या ठेकेदारावर कारवाई करून पुढील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरती वेळेस त्यांना काळ्या यादीत टाकावे त्यांना पुढील काम देऊ नये असा प्रश्न वैदेही वाढान यांनी उपस्थित करून कर्मचाऱ्यांची समस्या सभागृह समोर आणली मला हा प्रश्न अध्यक्षांना समजला नाही त्यांनी हे कंत्राट रद्द करा व सर्वांना कामावरून काढून टाका असे उत्तर दिल्याने वाढाण यांनी मूळ प्रश्न दोन ते तीन वेळा समजावून सांगितल्यावर सुद्धा अध्यक्ष यांनी ठराव करून टाका त्यांना काढून टाका अशा पवित्रा घेतल्याचे दिसत होते.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांची दहशत मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असून भरपूर जणांना कुत्र्यांनी चावे घेतले आहेत असाच प्रकार वाडा तालुक्यातील पिंपळस येथे घडला असून शाळेत जाणाऱ्या दोन लहान मुलांना कुत्र्याने चावा घेतला होता. या मुलांच्या पालकांनी त्या मुलांना ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेल्यावर त्यांना लस उपलब्ध नसल्याने त्यांनी कळवा किंवा ठाणा येथील रुग्णालयात जावे असे सांगितले त्यांची परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांनी त्या तिथे जाणे टाळले व त्यातील एका मुलीस रेबीजचा त्रास झाला व ती वेड्यासारखी वागू लागली तिच्या आजीलाही तिने चांवा घेतला . ती मुलीस रेबीजमुळे जीव गमवावा लागला तिच्यावर वेळीच उपचार जर ग्रामीण रुग्णालय झाले असते तर ती अकरा वर्षाची मुलगी जगली असती तिच्या भावाला ही कुत्रा चावला आहे मात्र ग्रामीण रुग्णालयाने त्या मुलास देखरेखी खाली ठेवणे अपेक्षित असताना तेही केले नाही ग्रामीण भागात कुत्रा चावण्याचे प्रमाण मोठे आहे मात्र कुठल्याच ग्रामीण रुग्णालयात त्याबाबतची लस उपलब्ध नसल्याने ठाणे अथवा कळव्याला पाठवले जाते त्यासाठी योग्य उपाय योजना करणे आवश्यक आहे मात्र सभेमध्ये आम्ही तिथे व्यवस्था करू असे उत्तर मिळते मात्र पुढे काहीच होत नाही तुमच्या हलगर्जीपणामुळे नाहक ऐका अकरा वर्षाच्या मुलीस जीव गमवावां लागल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्या अक्षता चौधरी यांनी केला त्यावर दरवेळेप्रमाणे प्रशासनाकडून थातूरमातूर उत्तर देऊन प्रश्नाची बोळवण करण्यात आली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन ची कामे करताना आपल्याला वाटेल त्या पद्धतीने कामे केली आहेत. अनेक ठिकाणी गटारे तोडण्यात आली आहेत पाईप सुद्धा तोडले गेले आहेत रस्त्याच्या मधोमध खणताना रस्त्याविषयी कुठलीही खातरजमा न करता रस्त्याची पूर्णपणे वाट लावली आहे जिथे काम सुरू आहेत तिथे अधिकारी वर्गाने जाणे अपेक्षित असताना कोणीही जात नाही रस्त्यांचे झालेले नुकसान कोण भरून देणार असाही प्रश्न सदस्यांनी उपस्थित करून महाराष्ट्र जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांची बोलती बंद केली.