अमरावती शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त (फोटो- सोशल मीडिया)
अमरावती शहरात बंदोबस्त, सोशल मीडियावर नजर
काल संध्याकाळी थंडावल्या प्रचाराच्या तोफा
८०५ मतदान केंद्रांवर होणार मतदान
अमरावती: निवडणूक प्रक्रियेअंतर्गत गुरुवारी (दि. १५) मतदान, तर शुक्रवारी (दि. १६) मतमोजणी होणार आहे. मतमोजणी नवसारी रोडवरील डॉ. पंजाबराव देशमुख किडा कॉम्प्लेक्स येथे सात झोननुसार केली जाणार आहे. निवडणुकीपूर्वी बुधवारी (दि. १४) सात झेननुसार मतपेट्यांचे वाटप करण्यात येणार आहे. महानगरपालिका क्षेत्रातील २२ वॉडाँमध्ये २३१ इमारतींतील ८०५ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी ६६१ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी प्रशासन व पोलिसांकडून कड़क सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सायबर पोलिस स्टेशनमार्फत सोशल मीडियावरील अफवा व हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यातून दोन विशेष पथके गोंधळखोरांवर कारवाईसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.
३७ सेक्टर पेट्रोलिंग
३७ सेक्टर पेट्रोलिंग मतदानाच्या दिवशी शहरात ३० सेक्टर पेट्रोलिंग पथके सतत गस्त घालतील. २२ विभागांमध्ये ४४ स्टेशन हाऊस ऑफिसर्स तैनात करण्यात आले आहेत. गुन्हे शाखेच्या नेतृत्वाखाली आठ विशेष पथके सक्रिय राहणार आहेत. मतदारांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणे आणि असामाजिक घटकांमध्ये भिती पाडण्यासाठी फ्रेजरपुरा, बडनेरा, राजापेठ व कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील पोलिसांनी रूट मार्च काले, या रूट मार्चद्वारे पोलिसांनी स्पष्ट केले की कोणत्याही प्रकारच्या गडबडी, अफवा किया कायदा-व्यवस्था भंग करण्याच्या प्रयत्लांना कडक पद्धतीने राबवले जाईल.






