देहूरोड : रावेत येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक मधुकर भोंडवे यांच्या सौजन्याने रावेत – किवळे परिसरात सार्वजनिक छट-पूजा आयोजित करण्यात आली होती. मळेकर वस्ती, पवना नदी विसर्जन घाट येथे आयोजित या उत्सवात उत्तर भारतीय कुटुंबांनी भक्तिभावाने सूर्योपासना केली व विविध प्रकारचा छट माईच्या पूजा व विधी करण्यात आले. यावेळी ‘जय छटी मैय्या’च्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता.
-उत्तर भारतीयांच्यावतीने दीपक भोंडवे यांचा सत्कार
या ठिकाणी विविध भागांतील उत्तर भारतीय कुटुंब सहभागी झाले. कार्यक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल अखिल उत्तर भारतीय संघ, रावेत-किवळे यांच्या वतीने दिपक मधुकर भोंडवे यांचा सत्कार करण्यात आला. संतोष मधुकर भोंडवे, संतोष सुरेश भोंडवे, सुनील भोंडवे, श्रीकांत नवले, विनय मोरे, विजय पानसरे, बजरंग दलाचे प्रवीण फाकटकर तसेच अखिल उत्तर भारतीय संघाचे आत्मा पाठक, दुर्गा ठाकुर, एम. पी. यादव, बळींदर ठाकुर, धर्मेंद्र ठाकुर, रामभूषण ठाकुर, वाल्मिकी समाजचे नेते ईश्वर बोथ, राजेश बोजवारे आदी उपस्थित होते.