बीड : निवडणुका येत असतात निवडणुका जात असतात. आम्ही लुठल्याही यशाने हुरळून जात नाहीत आणि अपयशाने खचून जात नाहीत. अशी आमची भारतीय जनता पार्टी आहे. देशसेवेसाठी जे जे करता येईल ते केंद्र सरकार काम करत आहे. राज्य सरकारने काय काय केलं हे आपण बघतच आहात. शेतकरी प्रश्नावर राज्य सरकारने विशेष लक्ष दिलं पाहिजे. सगळं खापर केंद्र सरकारवर फोडायचं आणि स्वतः मात्र काही करायचं नाही. अशी भूमिका महाराष्ट्रात राज्य सरकारची आहे. असा घणाघात केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी केला.
केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वात जास्त लस दिले. आर्थिक बजेट देखील दिले. त्याच श्रेय मात्र घेतलं जातं परंतू सांगत असताना लोकांमध्ये भ्रम निर्माण केलं जातं हे दुर्दैव आहे. भाजपच्या लोकांवर राज्य सरकार सूडबुद्धीने काम करत आहे. नारायण राणे असतील आणि इतर लोकांना त्रास देणे सुरू आहे. महिलांवर अन्याय अत्याचार होत असतील, तर त्यावर इतक्या लवकर गुन्हा दाखल होत नाही, परंतु आमच्या मात्र जाणीवपुर्वक आरोप होतो.
[read_also content=”ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन २१ एप्रिलला भारतात येणार, दोनदा रद्द झाला दौरा https://www.navarashtra.com/india/british-prime-minister-boris-johnson-will-come-to-india-on-april-21-tour-was-canceled-twice-269951.html”]
[read_also content=”दिल्लीतील दगडफेकीवरून केजरीवालांचं सुरक्षेवरून केंद्राकडे बोट https://www.navarashtra.com/maharashtra/delhi-violence-kejriwal-put-responsibility-of-security-on-centre-nrps-269972.html”]