मुंबई : मागच्या वर्षी बेस्ट प्रशासनाने (Best) २१०० सिंगल डेकर बसचा करार (Single Decker Bus Agreement) टाटा मोटर्सने (Tata Motors) घेतलेल्या आक्षेपामुळे (Objection) रखडला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बेस्ट प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य ठरवल्यामूळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेल्या ऑलेक्ट्रा (Olectra) आणि इव्हे ट्रान्सच्या (Eve Trans) इ बसेस (E Buses) आता बेस्टच्या ताफ्यात येणार असल्याने इ बसेसची संख्या वेगाने वाढेल.
सर्वोच्च न्यायालयाने नुकताच यावर निर्णय दिला त्यात उच्च न्यायालयाची परत निविदा मागवण्याची सूचना बाजूला ठेवत बेस्ट प्रशासनाची १४०० बसेस साठीच्या कंत्राटदाराची निवड प्रक्रिया योग्य ठरवली. या नुसार इव्हे ट्रान्सला मिळालेला १४०० सिंगल डेकर बसचा करार योग्य ठरला आहे. या बरोबरीने अजून ७०० सिंगल डेकर बसची मागणी देखील त्यावेळेस बेस्टने इव्हे ट्रान्सला दिली होती. त्यामुळे एकूण २१०० वातानूकुलित, अत्याधुनिक इ बसेस आता बेस्टच्या ताफ्यात लवकरच दाखल होतील.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 22 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-22-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]
जुन्या डिझेल बसेस या पर्यावरणीय नियमावली नुसार सेवेतून बाद होत असल्याने बेस्ट ताफ्यात मागच्या काळात बसेसचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे प्रवाशांसाठी दोन बसेस दरम्यानचा प्रतिक्षा कालावधीही वाढला होता. नवीन बसेस सेवेत दाखल होणार असल्याने बेस्टच्या प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळेल. शिवाय या बसेस पर्यावरण पूरक तसेच आवाज रहित आणि वातानूकुलित आहेत तसेच त्या भाडेतत्वावर असल्याने त्यासाठी भांडवली खर्च बेस्ट प्रशासनावर येणार नाही त्यामुळे आर्थिक बोजा न घेता बेस्ट आपल्या ताफ्यातील बसेसची संख्या वेगाने वाढवू शकेल. तसेच यावरील चालक आणि त्यांची देखभाल व विजेचा खर्च हा कंत्राटदाराने करायचा असल्याने बेस्टच्या प्रति किलोमीटर होणाऱ्या खर्चात देखील बचत होईल.