मुंबई– देशाच्या राजकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. देशपातळीवर भाजपाला पराभूत करण्यासाठी आता विरोधक आक्रमक झाले आहेत. मागील आठवड्यात नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद व काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक पार पडली. देशात भाजपाविरोधी (BJP) वातावरण तयार करण्यासाठी आणि विरोधकांना एकत्र आणण्यासाठी दिल्लीत विरोधी पक्षाच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीत (गुरुवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेसचे केंद्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Kharge) यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, के सी वेणुगोपाल बैठकीसाठी उपस्थित होते. यानंतर आता देशात भाजपाविरोधी मोट बांधण्यासाठी विरोधक आक्रमक झाले असून, काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल हे आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेची भेट घेणार आहेत. (today congress leader k c venugopal will meet uddhav thackeray)
विरोधकांना एकत्र आणण्यासाठी…
दरम्यान, देशात भाजपाविरोधी (BJP) वातावरण तयार करण्यासाठी आणि विरोधकांना एकत्र आणण्यासाठी जेवढे शक्य होईल, तेवढे विरोधकांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल हे उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली आहे. यानंतर आता देशात भाजपाविरोधी मोट बांधण्यासाठी विरोधक आक्रमक झाले असून, काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल हे आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेची भेट घेणार आहेत. (today congress leader k c venugopal will meet uddhav thackeray)
विरोधक एकत्र येणार?
दिल्लीतील बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. विरोधकांना एकत्र आणण्याची सुरुवात झाली आहे. देशात भाजापविरोधी विरोधक मोट बांधणार आहेत, असं शरद पवारांनी सांगितलं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आहे. भाजपाविरोधी राजकीय पक्षांना एकत्र आणण्याबाबत रणनीती आखण्यासाठी ही बैठक पार पडली. यावेळी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर खलबतं झाल्याचं समोर आलं आहे.
इतिहास घडणार…राहुल गांधी पहिल्यांदा मातोश्रीवर
देशात भाजपाविरोधी (BJP) वातावरण तयार करण्यासाठी आणि विरोधकांना एकत्र आणण्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. दिल्लीत पवार-गांधी यांची बैठक पार पडल्यानंतर आता आगामी काळात राहुल गांधी हे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी भेट घेणार आहेत. दरम्यान, इतिहासात प्रथमच गांधी कुटुंबातील कोणीतरी मातोश्रीवर जात आहे, त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे. पण भेट नेमकी कधी घेणार याची तारीख निश्चित ठरली नाही.