फोटो - सोशल मीडिया
मुंबई : आपल्या राज्याला मोठा समुद्रकिनारा आणि निसर्गाचे सौंदर्य लाभले आहे. सह्याद्री सारखी डोंगररांग आणि कोकण सारखी सुंदर किनारपट्टी लाभली आहे. त्यामुळे अनेक पर्यटन क्षेत्रे असून याचे योग्य नियोजन करण्याचा निर्णय राज्य सरकारने केला आहे. राज्याचे नवे पर्यटन धोरण येणार आहे. आज त्याच्या ठरावास सभागृहामध्ये मंजूर होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यामध्ये नवीन गुंतवणूक येण्यास व रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत.
महाराष्ट्राचे नवे पर्यटन धोरण करण्यात आले आहे. यामुळे पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार असून नवीन रोजगार निर्मिती होणार आहे. राज्. सरकारकडून 1 लाख नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याचे पर्यटन क्षेत्र व इतर धोरणं यांचा अभ्यास करुन पुढचे पर्यटन धोरण तयार करण्यात आले आहे. याला सभागृहामध्ये मंजूरी मिळाल्यानंतर ते राबवण्यात येणार आहे. यामध्ये टुरिस्ट कंपनी, ट्रॅव्हल एजंट, हॉटेलिंग व बस सुविधा यामध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडून आल्यानंतरच्या 100 केलेल्या घोषणांमध्ये याचा समावेश आहे. त्यामुळे आणखी एक घोषणा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. यापुढे राज्यासाठी वेगळे असे पर्यटन धोरण असणार आहे. या नवीन धोरणांतर्गत पर्यटन स्थळांचे सर्वेक्षण करुन त्याचे जतन केले जाणार आहे. तसेच आवश्यक त्या सुविधा पुरवल्या जाणार आहेत. यासाठी जिल्हानिहाय प्लॅन तयार केला जाणार आहे. हे राज्याचे नवीन पर्यटन धोरण आज विधीमंडळामध्ये मंजूर झाल्यास अनेक कामांना वेग येणार आहे. पर्यटन क्षेत्राच्या विकासासोबत आसपासच्या परिसरातील उद्योग क्षेत्रात प्रगती होण्यास मदत होणार आहे.






