Two women died on the spot and four others were seriously injured in a tragic accident involving a container and a black and yellow

मेहकर शहरातील पैनगंगा नदीजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरने जबर धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, यातील दोन महिला जागीच ठार झाल्या. या भीषण अपघातात मेहकर (Mehkar) तालुक्यातील उसरण (usaran )येथील (६२) वर्षीय पंचफुला आनंदा दुतोंडे तर ३५ वर्षीय यशोदा नारायण गवई या जागीच ठार झाल्या आहे.

    बुलढाणा : मेहकर (Mehkar) येथून प्रवाशी घेऊन साखरखेर्डा ( Sakharkharda) येथे जात असलेल्या काळी पिवळी( kali pivali ) या प्रवासी वाहनाला कंटेनरने ( Container )अचानक धडक दिली. या धडकेत दोन प्रवाशी महिलांचा जागीच मृत्यू (Death ) झालेला आहे. तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मेहकर (Mehkar) शहरातील पैनगंगा नदी ( Painganga River ) जवळील शीतला माता मंदिराजवळ ही घटना काल घडली आहे. मेहकर येथून प्रवासी वाहन क्र. एम एच – ३० (MH-30) पी – ५५६९( P-5569) साखरखेर्डा ( Sakharkharda) येथे जात होती.

    मेहकर शहरातील पैनगंगा नदीजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरने जबर धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, यातील दोन महिला जागीच ठार झाल्या. या भीषण अपघातात मेहकर (Mehkar) तालुक्यातील उसरण (usaran )येथील (६२) वर्षीय पंचफुला आनंदा दुतोंडे तर ३५ वर्षीय यशोदा नारायण गवई या जागीच ठार झाल्या आहे. तर या अपघातात नारायण गवई, शारदा गजानन तुपकर, प्रीती देवेंद्र ठाकूर व ललिता सचिनसिंग ठाकूर हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी (Mehkar Police) घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातास कारणीभूत ठरलेला कंटेनर मेहकर पोलिसांनी जप्त केला आहे.